शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यावरून सभा वादळी

By admin | Updated: May 30, 2017 00:15 IST

नाशिक : आरोग्य विभागाची उडालेली दैना, अधिकारी नसल्याने रुग्णांची होत असलेली हेळसांडया विषयांवर सदस्यांनी धारेवर धरल्याचे चित्र होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आरोग्य विभागाची उडालेली दैना, अधिकारी नसल्याने रुग्णांची होत असलेली हेळसांड आणि गरज नसताना केलेल्या बदल्या या अनेक विषयांवर सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागाला सदस्यांनी धारेवर धरल्याचे चित्र होते.दरम्यान, कोणालाही न सांगता परस्पर धुळे जिल्ह्यातून ३४ शिक्षकांना अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी परस्पर नाशिकला बदलून घेण्याच्या प्रकारामागे मोठी आर्थिक हेरफार झाली असून, त्याची चौकशी करण्याचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. तूर्तास या ३४ शिक्षकांना पुन्हा धुळे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे आदेश सभापती यतिन पगार यांनी शिक्षण विभागाला दिले.बाळासाहेब क्षीरसागर यांनी नैताळे आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून, निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप केला. येथे फक्त दिवसाच वैद्यकीय अधिकारी उपचार करीत असल्याचे सांगितले. एका परिचराने मद्य पिऊन रुग्णांसोबत असभ्य वर्तन केल्याचेही क्षीरसागर यांचे म्हणणे होते. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी देण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी दिले. संजय बनकर यांनी पाटोदा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याचे स्पष्ट केले. अश्विनी अहेर यांनी न्यायडोंगरी गटात तर १५० कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून, आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याचे सांगितले. लता बच्छाव यांनी ब्राह्मणगाव गटात तर आरोग्य विभागाची पदे रिक्त असल्याने आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप केला. हरिदास लोहकरे यांनी आरोग्याच्या झालेल्या बदल्यांमध्ये अनियमितता असल्याचे सांगितले.