शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचारी बिनधास्त; पीपीई किटचा वापर घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:14 IST

शहरातील मनपाच्या सहारा हॉस्पिटलमध्ये काही आरोग्य कर्मचारी पीपीई किट कधीतरी वापरत असल्याचे दिसून आले. तर काही कर्मचारी स्वतःच्या ...

शहरातील मनपाच्या सहारा हॉस्पिटलमध्ये काही आरोग्य कर्मचारी पीपीई किट कधीतरी वापरत असल्याचे दिसून आले. तर काही कर्मचारी स्वतःच्या बचावासाठी पीपीई किट आवर्जून वापरत असल्याचे समजते. मात्र, उन्हाचा कहर आणि घामाच्या धारांमुळे वैतागून पीपीई किट काही आरोग्य कर्मचारी वापरत नाहीत. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका असून जीव धोक्यात घालून उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किटचा वापर सक्तीने करण्याची गरज आहे. शासकीय रुग्णालयात कर्मचारीच पीपीई किट वापरत नसताना खासगी रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट मिळत नसल्याची तक्रार आहे. खासगी डॉक्टरांनी आम्ही पीपीई किट वापरतो असे सांगितले. मात्र, कर्मचाऱ्यांना किट नसल्याने आरोग्य धोक्यात घालून बाधितांवर उपचार करीत आहेत. सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी सक्तीने पीपीई किटचा वापर करीत असल्याचे सांगितले.

शासकीय रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स पीपीई किट वापरतात. परंतु शहरात इतर काही खासगी दवाखान्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णावर उपचार केले जातात. त्यातील काही डॉक्टर्स पीपीई किट वापरतात. परंतु काही डॉक्टर्स वापरतात की नाही हे सांगता येणार नाही.

- डॉ. सपना ठाकरे, वैद्यकीय अधिकारी, मनपा, मालेगाव

सामान्य रुग्णालयातील सर्वच डॉक्टर्स कोरोना बाधितांवर उपचार करताना पीपीई किट वापरत आहेत. आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत.

- डॉ. हितेश महाले, वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय, मालेगाव

शहरातील मनपाच्या सहारा हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधितांवर उपचार करणारे काही डॉक्टर्स पीपीई किट वापरतात तर काही डॉक्टर्स वापरत नाहीत. इतर काही आरोग्य कर्मचारी, वॉर्ड बॉय काही वेळा पीपीई किट वापरतात. परंतु उन्हाळा असल्याने किट घातल्यानंतर घाम निघतो म्हणून वापर टाळतात.

- आरोग्य कर्मचारी, मालेगाव

मालेगाव येथील काेरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर ताण येतो. आरोग्य प्रशासनासह, डॉक्टर, परिचारिका व मदतनीस कर्मचारी यांची दमछाक होते. रुग्णाला वाचविताना आपलाही जीव वाचावा यासाठी आम्ही पीपीई किटचा वापर करतो. इतरांनीही तो करणे आवश्यक आहे.

- आरोग्य कर्मचारी, मालेगाव

मी सामान्य रुणालयात उपचार घेत आहे. येथे डॉक्टर्स पीपीई किट घालूनच आमच्यावर उपचार करतात. काही कर्मचारी मात्र पीपीई किट वापरत नसल्याचे दिसून आले. मात्र, सर्व डॉक्टर्स पीपीई किट परिधान करूनच उपचार करीत आहेत.

- अविनाश गांगुर्डे, बाधित, सामान्य रुग्णालय, मालेगाव

उन्हाचा उकाडा वाढल्याने घामाच्या धारा निघतात. बरेच डॉक्टर्स पीपीई किट वापरतात. मात्र, आरोग्य कर्मचारी पीपीई किट वापरताना दिसत नाहीत. काही कर्मचारी कधी कधी पीपीई किट परिधान करून येतात. बरेच कर्मचारी पीपीई किटचा वापर करीत नाहीत.

- एक बाधित, सहारा रुग्णालय, मालेगाव

आम्ही पीपीई किट परिधान करूनच रुग्णांची तपासणी करतो. सर्व रुग्ण कोरोनाचे नसले तरी कोण बाधित आहे हे कळत नाही. कर्मचाऱ्यांनादेखील पीपीई किट वापरण्याची सक्ती करतो.

- डॉ. मयूर शहा, मालेगाव

===Photopath===

120521\12nsk_40_12052021_13.jpg

===Caption===

पीपीई किट परिधान करुन उपचार करताना कर्मचारी.