शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांनी ठोकला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:36 IST

नाशिक : नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील वसंतनगर तांड्यावरील रहिवाशांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्यानंतर गावातच आरोग्य कर्मचाऱ्यांनी तळ ठोकला असून, तातडीची उपायोजना म्हणून तात्पुरता इमर्जन्सीकक्ष गावातील मंदिरातच सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, सदर आजाराचा फैलाव हा दूषित पाण्यामुळेच झाला असल्याचा संशय आहे.

ठळक मुद्देउपाययोजना : दूषित पाण्यामुळेच त्रास झाल्याचा अंदाज

नाशिक : नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील वसंतनगर तांड्यावरील रहिवाशांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्यानंतर गावातच आरोग्य कर्मचाऱ्यांनी तळ ठोकला असून, तातडीची उपायोजना म्हणून तात्पुरता इमर्जन्सीकक्ष गावातील मंदिरातच सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, सदर आजाराचा फैलाव हा दूषित पाण्यामुळेच झाला असल्याचा संशय आहे.नांदगाव तालुक्यातील जातेगाव ग्रामपंचायत अंतर्गत वसंतनगर तांडा येथे टरबूज खाल्याने २० ते २५ लोकांना अचानक उलटी व जुलाबाचा त्रास झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यासुनार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत गावात आरोग्य पथक पाठवून उपचार सुरू करण्यात आले. सात जणांवर नांदगाव येथील ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले, तर सात जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. आजवर दवाखान्यात दाखल असलेल्या सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, प्रकृती नियंत्रणात असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.जातेगाव येथील वसंतनगर येथे शुक्र वारी गावातील लोकांना दुपारी अचानक उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. सायंकाळी हा त्रास वाढल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी बोलठाण येथील डॉ. नवरे यांच्यासह त्यांच्या पथकाला तत्काळ गावात पाठवून रुग्णावर उपचार करण्यात आले होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी गट विकास अधिकारी जगन सूर्यवंशी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी गावात थांबून नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले.दरम्यान, ग्रामस्थांनी खाल्लेल्या टरबुजाचा नमुना घेऊन तपासणी करण्याचे निर्देश डॉ. नरेश गिते यांनी आरोग्य विभागाला दिले असून, त्यानुसार नमुने तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. असे असले तरी रुग्णांच्या आजारपणाचे लक्षण आणि इतक्या जणांना झालेली लागण लक्षात घेता हे दूषित पाण्यामुळे झाल्याची शक्यता असल्याने येथील पाणीपुरवा सुरक्षित करण्याचे आदेशदेखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी दिले आहेत.