शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाथरे येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:42 IST

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ७६ वर्षीय वृद्धाची कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्याने पाथरे कोरोना मुक्त झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. आपल्या शस्त्रक्रियेसाठी कोपरगाव येथील दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्यांना कोरोना असल्याचे निस्पंन्न झाले होते.

ठळक मुद्देबाधित रुग्णाच्या परिसरातील कुटुंबांचे दररोज तपासणी

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ७६ वर्षीय वृद्धाची कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्याने पाथरे कोरोना मुक्त झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. आपल्या शस्त्रक्रियेसाठी कोपरगाव येथील दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्यांना कोरोना असल्याचे निस्पंन्न झाले होते. पुढील उपचारासाठी त्यांना सिन्नर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. आता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. त्यांचे स्वागत येथील उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी केले. या चौदा दिवसांच्या कालावधीत कोरोना बाधित रुग्णाच्या परिसरातील कुटुंबांचे दररोज तपासणी केली जात होती. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी दररोज तपासणी केली. या कर्मचाऱ्यांचा सत्कार सिन्नर येथे तालुका आरोग्य अधिकारी मोहन बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आला होता. पाथरे येथील उपकेंद्रातही येथील समुदाय आरोग्य अधिकारी गायत्री मगर, आरोग्य सेविका कमल मुंतोडे यांनी चौदा दिवस काळजीपूर्वक तपासणी करून सेवा देणाऱ्या आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करून मनोबल वाढवले. कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ग्रामस्थांनी यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. गाव निगेटिव्ह असल्याने बिनधास्त बिगर मास्कचे गर्दीत फिरणे टाळावे असाही सल्ला यावेळी देण्यात आला.यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी गायत्री मगर, आरोग्य सेविका कमल मुंतोडे, मंदा पाचोरे,अनिता गुंजाळ, मीनाताई पगारे, सुषमा गवळी,उज्वला डोंगरे, जयश्री ढवन, सुनंदा बिडवे, सुमन नरोडे, रागिनी नरोडे, बेबी चीने, जयश्री पडवळ, गायत्री नाईकवाडे, आशा सोमवंशी, सपना सोमवंशी, प्रभावती शेरे आदी कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरcorona virusकोरोना वायरस बातम्या