शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:55 IST

शहरात डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. पेस्ट कंट्रोल होत नाही. ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले दिसून येतात. स्वच्छता निरीक्षक जागेवर नसतात, या समस्यांचा पाढा वाचत महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाºयांची झाडाझडती घेतली. कामात सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशाराही महापौरांनी दिला.

नाशिक : शहरात डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. पेस्ट कंट्रोल होत नाही. ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचलेले दिसून येतात. स्वच्छता निरीक्षक जागेवर नसतात, या समस्यांचा पाढा वाचत महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाºयांची झाडाझडती घेतली. कामात सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशाराही महापौरांनी दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांची बैठक घेत शहरातील आरोग्यविषयक समस्यांचा आढावा घेतला. यावेळी डॉ. राहुल गायकवाड यांनी शहरात गेल्या तीन आठवड्यात ५१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे सांगितले. डेंग्यू नियंत्रणासाठी शहरात ६२ पथके कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु, शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक असल्याचे सांगत महापौरांनी त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. शहरात आरोग्य विभाग नुसता कागदोपत्री असल्याचा आरोप करत महापौरांनी अधिकारी व कर्मचाºयांची काम करण्याची मानसिकताच नसल्याचे सांगितले. धूर व औषध फवारणीवर विभागाचे नियंत्रण नाही. नगरसेवकांना फवारणीची माहिती दिली जात नाही. स्वच्छता निरीक्षकही काम करताना दिसून येत नसल्याचे महापौरांनी सांगितले. यापुढे स्वच्छता निरीक्षकांनी नगरसेवकांची भेट घेऊन माहिती द्यावी आणि त्यांच्या भेटीचे प्रमाणपत्र महापौर कार्यालयाला सादर करावे, अन्यथा त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही महापौरांनी दिला.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचेही आदेश महापौरांनी दिले. बैठकीला उपमहापौर प्रथमेश गिते, आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी, उपसभापती योगेश शेवरे उपस्थित होते.