शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

आरोग्य : खानावळी, चहाटपऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: October 31, 2014 22:41 IST

उघड्यावरील उष्टावळ रोगराईला देते निमंत्रण

मालेगाव : शहर व परिसरातील विविध हॉटेल्स, खानावळ व चहाटपरी येथे अत्यंत गलिच्छ वातावरण राहत असून, तेथील उष्टावळी व केरकचरा शहरभर विविध ठिकाणी उघड्यावर पडत असल्याने शहरात रोगराई पसरत आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाने शहरात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच संबंधित हॉटेल्स - खानावळ व चहाटपऱ्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मालेगाव शहर - परिसरातून रोज जवळपास आठ ते दहा लक्ष लोकसंख्येचे वास्तव्य व ये - जा सुरू असते. शहरात यंत्रमाग व्यवसायावर काम करणारे कारागीर मोठ्या संख्येने असून, त्यांच्यासाठी असलेल्या खानावळी, चहाटपरी व छोट्यामोठ्या हॉटेल्स यांची संख्या लक्षणीय आहे. शहरातील बाजारपेठा, बसस्थानक प्रमुख चौक येथेही शाकाहारीसोबत मांसाहारी हॉटेल्सची संख्या वाढलेली आहे. याशिवाय शहरातील मध्यमवर्गीय व उच्चवर्णीय जनतेसाठीही शहर परिसरात काही हॉटेल्स निर्माण झाली आहेत. यापैकी शहराच्या दाटवस्तीत जी छोटी-मोठी हॉटेल्स-खानावळी व चहाटपरी आहेत, तेथील वातावरण अत्यंत गलिच्छ स्वरूपाचे आहे. काही हॉटेल्स, खानावळी व चहाटपऱ्या या रस्त्याच्या कडेला, खुल्या गटारनाल्यावर, त्यालगत आहेत. त्यामुळे येथे दिवसरात्र माशा, डास व विविध कीटकांचा मुक्त संचार असतो. याशिवाय या हॉटेल्स - खानावळमधील विविध प्रकारची उष्टावळी व केरकचरा हा रात्री उशिरा वा भल्या सकाळी हॉटेल्सच्या परिसरातच वा मुख्यरस्त्यालगत उघड्यावर टाकला जातो. मनपा प्रशासनातर्फे मुळात शहरातील गटार नाल्यांची साफसफाई ठीक होत नाही. गटारीतून काढलेला कचरा बरेच दिवस उचलला जात नाही. त्यात या हॉटेल्स - खानावळ व चहाटपरींमधील उष्टावळी व केरकचऱ्याने अधिक भर पडते. या कचऱ्यात प्लास्टीक पिशवी, ग्लास, भांडे आदिंचा समावेश असतो.याचा दुष्परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्याच्या दुर्गंधीमुळे अनेकांना श्वसन व पचनसंस्थेचे आजार जडले आहे. मनपाच्या स्वच्छता निरीक्षकांचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झालेले आहे. शहरात डेंग्यू, मलेरियासह विविध साथीच्या आजाराचे रुग्ण वर्षभर असतात. अशा अस्वच्छ परिसरामुळे त्यांना आरोग्यदायी वातावरणापासून दूर रहावे लागते. त्यामुळे मनपा प्रशासनाने शहरात यासंबंधी व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने यासंबंधी चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.