शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य, स्वच्छताप्रश्नी गाजली सभा

By admin | Updated: June 30, 2017 00:33 IST

नाशिकरोड : स्वच्छतेचा प्रश्न, कीटकनाशक फवारणी, बिटको रुग्णालयातील समस्या आदी विषयांवरून नाशिकरोड प्रभागाच्या पहिल्याच बैठकीत गरमागरम चर्चा झाली

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : स्वच्छतेचा प्रश्न, पावसाचे साचणारे पाणी, कीटकनाशक फवारणी, बिटको रुग्णालयातील समस्या आदी विषयांवरून नाशिकरोड प्रभागाच्या पंचवार्षिकच्या पहिल्याच बैठकीत गरमागरम चर्चा झाली.मनपाच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर गुरुवारी नाशिकरोड प्रभागाची पहिलीच बैठक प्रभाग सभापती सुमन सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभी विषय पत्रिकेवरील सातही विषयांना प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली.यावेळी अस्वच्छता व ठिकठिकाणी साचणारे पावसाचे पाणी यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. देवी चौकात साचणारे पावसाचे पाणी, दत्तमंदिररोड एसटी महामंडळाच्या जागेवर टाकण्यात येणारा केरकचरा, घाण, हॉटेल व हातगाड्यावरील अन्नपदार्थ याबाबत उपाययोजना व कारवाई करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक ठिकाणी भूमिगत गटार योजनेचे चेंबर हे रस्त्याला समांतर नसून काही उंचीवर असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही ते चेंबर अपघाताला आमंत्रण देत आहे. स्मशानभूमी येथील वखारीवर शेड नसल्याने लाकडे ओली होत असल्याने अंत्यसंस्कारप्रसंगी मोठी अडचण येत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. मनपा निवडणुकीतील कामांचे कर्मचाऱ्यांची बिले प्रलंबित आहेत, सफाई-स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना रेनकोट, गमबूट देण्यात यावे, मलेरिया विभागांचा कीटकनाशक फवारणीचा ठेका दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या फवारणीचा कुठलाही फायदा होत नसून ती फवारणी फक्त देखावा ठरत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. बैठकीला नगरसेवक रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, संतोष साळवे, संभाजी मोरूस्कर, दिनकर आढाव, पंडित आवारे, केशव पोरजे, शरद मोरे, विशाल संगमनेरे, सत्यभामा गाडेकर, कोमल मेहरोलिया, जयश्री खर्जुल, ज्योती खोले, सुनीता कोठुळे, रंजना बोराडे, सरोज अहिरे, डॉ. सीमा ताजणे, मीराबाई हांडगे, मंगला आढाव व अधिकारी उपस्थित होते.