नाशिक : प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी अंतर्गत विविध रक्तांच्या चाचण्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचा ७५ नागरिकांनी आरोग्य सोहळ्यांतर्गत लाभ घेतला. स'ाद्री रुग्णालयामध्ये इंडस हेल्थ प्लस व रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती रुग्णालयाचे कें द्रप्रमुख सोहम भाटवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून नागरिकांना आजारांचे पूर्वनिदान व्हावे, जेणेकरून गंभीर आजार आढळून आल्यास त्याच्यावर प्राथमिक स्तरावर उपचार करणे शक्य होईल, हा यामागचा उद्देश असल्याचे भाटवडेकर म्हणाले. बहुतांशी आजारांचा नकळत शरीरामध्ये शिरकाव होतो व कालांतराने हे आजार गंभीर स्वरूप धारण करतात. त्यासाठी कोणत्याही आजाराच्या निदानामुळे आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये योग्य उपचार करणे शक्य होते, यासाठी अशा शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना सवलतीच्या दरांमध्ये विविध चाचण्या व डॉक्टरांकडून तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, असे भाटवडेकर पुढे म्हणाले. आतापर्यंत इंडसच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात ८५०० तपासणी शिबिर घेण्यात आल्याची माहिती ‘इंडस’चे विपणन प्रमुख शिवरुद्र यांनी यावेळी दिली. यावेळी डॉ. प्रवीण सुरवाडे, प्रीती झवर उपस्थित होते.
आरोग्य सोहळ्यात ७५ नागरिकांची तपासणी
By admin | Updated: July 5, 2015 01:07 IST