येवला : येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ते २९ जूनदरम्यान सकाळी १0 ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान या शिबिराचे आयोजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग तपासणी, किडणी रोग तपासणी, गर्भपिशवीवरील आजार व लहान मुलांचे जन्मजात व्यंगावर निदान व आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रियादेखील केल्या जाणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य तपासणी शिबिर
By admin | Updated: June 29, 2014 00:52 IST