येवला : येवले तालुक्यातील नांदेसर येथे मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी गुरु कृपा हॉस्पिटल ठाणे यांच्या सहकार्याने डॉ. हकीम शेख, डॉ. वेदांत काशीकर, डॉ. अमोल मोटेगावकर, डॉ. रवींद्र मेंडन यांनी उपचार केले व औषधांचे मोफत वाटप केले. कृषी मित्र परशराम मापारी, डॉ. गणेश घोरपडे, समाधान घोडके यांनी सहकार्य केले. नांदेसरचे सरपंच सुभाष वाघ, उपसरपंच विजय वाघ व सर्व सदस्य, अमोल बेंडके, सुनील कोकाटे, मच्छिंद्र वाघ, ग्रामसेवक सौ. पवार यांनी शिबिराचे आयोजन केले. ग्रामशक्ती समाजसेवातर्फेसेंद्रिय खत मार्गदर्शन, तुलसी आय केअर कॅम्प आदी उपक्र म राबविले जातात. यावेळी ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला व सर्वांचे कौतुक केले.
नांदेसर येथे आरोग्य तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:12 IST