शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणमधील आरोग्य केंद्रही होणार डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:19 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक शाळांची वाटचाल डिजिटलकडे होत असताना आता जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रही डिजिटल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, पहिल्या टप्प्यात सहा आरोग्य केंद्रांसाठी सहा कोटी रु पयांचा निधी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून उपलब्ध करण्यात आला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय आरोग्य अभियानातून बागलाणसाठी निधी उपलब्ध

सटाणा : बागलाण तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक शाळांची वाटचाल डिजिटलकडे होत असताना आता जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रही डिजिटल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, पहिल्या टप्प्यात सहा आरोग्य केंद्रांसाठी सहा कोटी रु पयांचा निधी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून उपलब्ध करण्यात आला आहे.या निधीमधून आरोग्य केंद्राचे बांधकाम, सर्व सोयीसुविधांनी अद्ययावत आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे जिल्हा परिषदेमार्फत विविध आरोग्य केंद्र अद्ययावत करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात बागलाणमधील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी सुमारे पाच कोटी ९३ लाख रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांना चांगल्या दर्जाची भौतिक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार यांच्याकडे केली होती.सभापती पगार यांनी डिजिटल प्राथमिक शाळा, अंगणवाड्या या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रही डिजिटल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आरोग्य केंद्राचे बांधकाम व अद्ययावत सोयीसुविधांसाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे सादर केला होता.पहिल्या टप्प्यात बागलाण तालुक्यातील अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २ कोटी ६२ लाख रु पये, नीरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ६३ लाख, केळझर व कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी ६० लाख रु पये, मुल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ५७ लाख रु पये, साल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ५५ लाख रु पये, वीरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ३६ लाख रु पये मंजूर करण्यात आले आहेत.आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून मर्यादित निधी मिळत असल्यामुळे अडचणी निर्माण होतात. परिणामी ग्रामीण आदिवासी भागातील रु ग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते. हे थांबविण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून बागलाणसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.- यतिन पगारसभापती, शिक्षण व आरोग्य