शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर; होमिओपॅथीला डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:46 IST

भारतीय चिकित्सा पद्धतीत आयुर्वेदासोबतच सिद्ध, युनानी, योग आणि होमिओपॅथीचाही समावेश होतो. परंतु, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटरच्या कम्युनिटी हेल्थ आॅफिसर (सीएचओ) तथा उपआरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी नियुक्ती प्रक्रियेत बीएएमएस पदवीची अट असल्याने होमिओपॅथी (बीएचएमएस) डॉक्टरांना डावलले गेले आहे.

नाशिक : भारतीय चिकित्सा पद्धतीत आयुर्वेदासोबतच सिद्ध, युनानी, योग आणि होमिओपॅथीचाही समावेश होतो. परंतु, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटरच्या कम्युनिटी हेल्थ आॅफिसर (सीएचओ) तथा उपआरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी नियुक्ती प्रक्रियेत बीएएमएस पदवीची अट असल्याने होमिओपॅथी (बीएचएमएस) डॉक्टरांना डावलले गेले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग होमिओपॅथीला सापत्न वागणूक देत असल्याची भावना निर्माण झाली असून, हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटरमध्ये बीएएमएस सोबतच बीएचएमएस डॉक्टरांचाही सीएचओ म्हणून समावेश करावा तसेच प्रत्येक उपआरोग्य केंद्रावर बीएचएमएस डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी होमिओपॅथी डॉक्टरांकडून होत आहे.  केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून संपूर्ण भारतात हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटरच्या माध्यमातून कम्युनिटी हेल्थ आॅफिसरची नियुक्ती करण्यात येणार आहे.हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर; होमिओपॅथीला डावलले  त्यासाठी राज्य सरकारने भरती प्रक्रियाही सुरू केली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण देशभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उपकेंद्रांवरही दीड लाख पदांची भरती करण्यात येणार आहे. परंतु या पदांच्या भरतीसाठी पात्रतेच्या निकषांमध्ये बीएएमएस पदवी आवश्यक करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे ७० हजार बीएचएमएस डॉक्टरांसह देशभरातील सुमारे अडीच लाख होमिओपॅथी डॉक्टरांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या पात्रतेच्या निकषांमध्ये आवश्यक ते बदल करून सीएचओ पदासह उपकेंद्रस्तर पदांवरील भरतीसाठी बीएचएमएस डॉक्टरांनाही संधी मिळावी, अशी मागणी होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी केली आहे.होमिओपॅथी डॉक्टरांना अन्य पॅथींच्या तुलनेत समसमान वागणूक मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सीएचओ आणि उपकेंद्र स्तरावरील पदांच्या भरतीसाठी बीएचएमएस डॉक्टरांना संधी मिळावी, यासाठी प्रक्रियेत आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे.- डॉ. अमित भस्मे, सिनेट सदस्य, महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदdoctorडॉक्टर