शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खातेप्रमुखांनी जबाबदारीने कामे करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:10 IST

त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीमधील प्रत्येक खातेप्रमुखाने आपली जबाबदारी ओळखून कामे करावीत, उगीच दुसऱ्यावर ढकलू नयेत, अशी कानटोचणी आमदार हिरामण ...

त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीमधील प्रत्येक खातेप्रमुखाने आपली जबाबदारी ओळखून कामे करावीत, उगीच दुसऱ्यावर ढकलू नयेत, अशी कानटोचणी आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबक पंचायत समितीच्या आढावा बैठकीत केली. सोमनाथ नगर येथील शाळा इमारतीच्या अर्धवट बांधकामाचा विषय होता. त्यावेळेस ते काम आम्ही केले नसून ग्रामपंचायतीने केले आहे. आम्ही केले नाही असे इमारत व दळणवळण विभागाचे उपविभागीय अभियंता शिरसाट यांनी सांगितल्याने आमदार संतापले. ते म्हणाले काम कोणीही करो, पण तुमच्याच अखत्यारीत येते ना ? उगीच सर्व जबाबदारी तुमची असताना ग्रामपंचायतीवर खापर फोडणे योग्य नाही. म्हणून प्रत्येक खातेप्रमुखाने कामाची गुणवत्ता टिकावूपणा पाहावा. उगीच आपली जबाबदारी झटकून टाकू नये, अशी तंबी खोसकर यांनी दिली.

खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी गटविकास अधिकारी किरण जाधव, सहायक गटविकास अधिकारी पाठक, माजी जि. प. उपाध्यक्ष संपतराव सकाळे, विनायक माळेकर, संतोष डगळे, रवींद्र भोये, जयराम मोंढे, मधुकर झोले आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक एकस्तर वेतनश्रेणी दप्तर दिरंगाईची तक्रार शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांनी केली. संबंधित महिला लिपिक यांनी याबाबत उत्तर दिले. यावेळी चांगलाच वाद रंगला. यावर गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी, आपण शुक्रवारपर्यंत तुमची मागणी पूर्ण करू, असे सांगितले.

दरम्यान, यावेळी ग्रामीण पाणी पुरवठाचे शशिकांत शिंदे, धनाजी शेवाळे, शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाट, पी. के. शिरसाट, आहेर आदी अधिकारी उपस्थित होते.

-------------------------

तिसऱ्या लाटेसाठी उपाययोजना

आरोग्य खात्यावर बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांनी आकडेवारीसह कोविड सद्यस्थिती व तिसऱ्या लाटेबाबत केलेली उपाययोजना सज्जता, लसीकरणाची परिस्थिती विषद केली. सध्या १८ हजाराच्या वर लसीकरण झाले असून सर्व सात आरोग्य केंद्रे, ३५ उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण सुरू आहे. गुजरात सीमेवरील मुळवड परिरातील बऱ्याच वाड्या, पाडे येथे अशिक्षित अंधश्रद्धा यामुळे लसीकरण करून घेण्यास विरोध करतात. यावर खोसकर यांनी, सर्व खात्यांच्या अधिकारी, कर्मचारी यांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, लोकांचे मन वळविण्यास मदत करावी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, सरपंच, ग्रामसेवक, आरोग्यसेवक आदींनी लोकांचे प्रबोधन करावे व त्यांचे लसीकरण करवून घ्यावे, अशा सूचना केल्या.

(२९ टीबीके १)

===Photopath===

290621\29nsk_5_29062021_13.jpg

===Caption===

२९ टीबीके १