शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

...त्यांनी उलगडला २२ देशांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:58 IST

आपल्याकडे समाजनिर्मितीला लग्नसंस्थेशी आणि संस्कारांशी जोडण्यात आलेले आहे. कुटुंबातील माता शिकली तर अख्ये कुटुंब शिक्षित होते, परंतु त्याही पुढे जाऊन शिक्षणाबरोबरच मातेचे संस्कारही मुले घडवित असल्याने भारतीय कुटुंबव्यवस्थेतील हा संस्कार इतर देशांपुढे मांडण्यासाठी सुरू केलेला प्रवास सफल झाला,

नाशिक : आपल्याकडे समाजनिर्मितीला लग्नसंस्थेशी आणि संस्कारांशी जोडण्यात आलेले आहे. कुटुंबातील माता शिकली तर अख्ये कुटुंब शिक्षित होते, परंतु त्याही पुढे जाऊन शिक्षणाबरोबरच मातेचे संस्कारही मुले घडवित असल्याने भारतीय कुटुंबव्यवस्थेतील हा संस्कार इतर देशांपुढे मांडण्यासाठी सुरू केलेला प्रवास सफल झाला, अशी भावना ‘मदर्स आॅन व्हील’ संकल्पना राबविणाऱ्या मातांनी व्यक्त केल्या.  भारतीय कुटुंबव्यवस्था आई आणि मूल यांच्यातील अनोख्या भावबंधनाची आणि संस्कशराची महती सांगण्याचा उपक्रम घेऊन कारमधून २२ देशांचा प्रवास करणाºया  माधुरी सहस्त्रबुद्धे (दिल्ली), शीतल वैद्य-देशपांडे (पुणे), उर्मिला जोशी (पुणे) आणि माधुरी सिंग (ग्वाल्हेर) या चौघींनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. या ‘चारचौघीं’चा या प्रवासाचा अनुभव कसा होता, याविषयी गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुल येथे या मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या अनुभवाचा प्रवास उलगडला.दिल्ली ते नेपाळ आणि चायना मार्गे युरोपातील देशांमध्ये मातृत्वाचा प्रसार कसा होता, याविषयी त्यांनी अनुभव कथन केले. आजच्या काळात कुटुंबव्यवस्थेच्या संस्काराला आव्हान देणाºया अनेक संकल्पना मान्य पावत आहेत.कोणत्याही संस्काराशिवाय एकत्र राहाणे आणि विभक्त होण्याची सहजप्रक्रिया यातून निर्माण होणाºया नातेसंबंधाच्या गोंधळातून समाजातील वातावरण कलुषित झाले आहे. कुटुंबातील मातेचे महत्त्व आणि मातेने केलेल्या संस्कारावर घडणारी पिढी याचे भावबंध या चौघींनी २२ देशांत रूजविले.महिला असतानाही केवळ कारने २२ देशांचा प्रवास, त्यासाठी लागणाºया परवानग्या, तेथील भाषा आणि चलनांचा फरक, राहण्याचे ठिकाण, अडचणीतील रस्ते यातून मार्ग काढत युरोपीय देशांमध्ये पोहोचण्याचा अवघड प्रवास त्यांनी मांडला. स्वरदा लगड यांनी त्यांची मुलाखत घेतली.

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिला