शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना खबर दिल्याच्या संशयावरून कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:10 IST

पंचवटी : पोलिसांना खबर देण्याच्या शंशयातून वाद घालत कुरापत काढून दोघा जणांनी दोन सख्ख्या भावांना बेदम मारहाण करून हातावर ...

पंचवटी : पोलिसांना खबर देण्याच्या शंशयातून वाद घालत कुरापत काढून दोघा जणांनी दोन सख्ख्या भावांना बेदम मारहाण करून हातावर कोयत्याने वार केल्याची घटना अमृतधाम अयोध्यानगर येथे घडली आहे. या घटनेत युवकाच्या पंजावर गंभीर दुखापत झाली असून, पोलिसांनी वार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्यानगर येथील सूर्यपुत्र सोसायटी येथे शुक्रवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मनोज नेमीचंद छाजेड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर ऊर्फ काळू रमेश गायकवाड व अंकुश रमेश गायकवाड या सख्ख्या भावंडांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या शुक्रवारी सायंकाळी संशयित आरोपी गायकवाड बंधूंनी मनोज छाजेड व त्याच्या भावाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी धारदार कोयत्याने मनोजच्या उजव्या हातावर वार केला. त्यात त्याच्या हाताच्या चार नसा कापल्या गेल्याने मनोज गंभीर जखमी झाला आहे. मारहाण करणारे गायकवाड बंधू हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर घटनेनंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, याबाबत पंचवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.