शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांनी’ भाजीमंडईतच थाटला संसार

By admin | Updated: August 8, 2016 00:19 IST

पुराचा फटका : बेघरांनी शोधला निवारा

 संदीप झिरवाळ पंचवटीगेल्या मंगळवारी गोदावरीला आलेल्या पुरामुळे झोपडपट्टीत पाणी शिरल्याने अनेकांचे संसार वाहून गेले. मंगळवारी आलेल्या पुराचे पाणी ओसरत नाही तोच शनिवारी पुन्हा पूर आल्याने अनेक बेघरांनी गणेशवाडीतील भाजीमंडईचा आधार घेत तेथेच चूल मांडल्याने मनपाची भाजीमंडई सध्या बेघरांचे आश्रयस्थान बनली आहे. मंगळवारी आलेल्या पुरामुळे गंगाघाट परिसरात वास्तव्य करणाऱ्या अनेकांच्या झोपड्या, पाल वाहून गेले. पावसाचा मारा सुरूच असल्याने या शेकडो बेघरांना लपंडावचा खेळ खेळावा लागला. पूर आल्याने काहीकाळ मनपाच्या भाजीमंडईचा आधार घेतला खरा, पण दुपारी पुराच्या पाण्याने भाजीमंडईला कवेत घेतल्याने बेघरांची पळापळ झाली. गुरुवारी पाऊस उघडल्याने व पुराचे पाणी ओसल्यानंतर या बेघरांनी पुन्हा नदीकाठी झोपड्या, पाल टाकले मात्र शनिवारी मध्यरात्री सुरू झालेल्या पावसामुळे त्यांची दाणाफाण उडाली. रात्रीतून जायचे कोठे म्हणून पुन्हा या बेघर कुटुंबांनी लहान मुले, भांडी, कपड्यांची गाठोडी उचलून मनपाच्या भाजीमंडईचा रस्ता गाठला. सध्या या बेघरांनी भाजीमंडईलाच घर मानून तेथेच चूल पेटवित दाटीवाटीने संसार मांडला आहे. महापालिकेने भाजीविक्रे त्यांसाठी बनविलेल्या सर्वच ओट्यांवर या बेघरांनी सहारा घेतला असल्याचे चित्र सध्या भाजीमंडईत दिसून येत आहे. पुरामुळे भाजीमंडईत संपूर्ण गाळ व चिखल साचल्याने तेथे उघड्यावर संसार मांडलेल्या शेकडो बेघरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.