शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

घरातून रोकड घेत अंगणातून कारही लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:16 IST

गोविंद बाबुलाल मालविया (रा.गायत्री रो-हाऊस) यांनी अंबड पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार मालविया कुटुंबीय रविवारी (दि.२७) रात्री आपल्या घरात असताना अज्ञात ...

गोविंद बाबुलाल मालविया (रा.गायत्री रो-हाऊस) यांनी अंबड पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार मालविया कुटुंबीय रविवारी (दि.२७) रात्री आपल्या घरात असताना अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास येत त्यांच्या घराची खिडकी उघडी असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी बेडरुममधील टेबलावर ठेवलेला मोबाईल आणि ड्राॅवरमधील दोन हजारांची रोकड अगोदर लांबविली. यानंतर तेथून पोबारा करताना चोरट्यांनी चक्क घरापुढे उभी असलेली कारही (एमएच १५ जीए ४३६८) पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार रंजन बेंडाळे करीत आहेत.

----

मदतीसाठी हात पुढे केला अन‌् दुचाकीला मुकला

नाशिक : एका बनावट गरजू युवकाने स्वत:ला दुचाकीची मदत हवी असल्याचा बनाव रचत मदत म्हणून दिलेली दुचाकी चोरट्याने गायब केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनीत रमेश इंगळे (५२, रा.शिरसगाव, ता. निफाड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. इंगळे गेल्या बुधवारी (दि.२३) कामानिमित्त शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास ते काठे गल्लीतील त्रिकोणी गार्डन भागात एका चहाच्या टपरीवर थांबले असता ही घटना घडली. चहा घेत असताना एक तरुण तेथे आला व त्याने ‘थोड्या अंतरावर महत्त्वाचे काम आहे, तुमची गाडी देता का’ असे सांगून त्यांच्याकडे दुचाकीची मागणी केली. यावेळी इंगळे यांनी त्यांची दुचाकीची (एमएच १५ एफवाय ९५०१) किल्ली त्याच्या हाती सोपविली. त्या भामट्याने इंगळे यांची दुचाकी घेऊन कायमचाच पोबारा केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----

चक्कर येऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू

नाशिक : काम करीत असताना चक्कर येऊन पडल्याने कारखाना कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना औद्योगिक वसाहतीत घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेखर भगवान कोरडे (४८, रा.निगळ पार्क जवळ,शिवाजीनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे. कोरडे औद्योगिक वसाहतीतील पीसीएम फोजझीन अ‍ॅण्ड सॅमसिंग या कारखान्यात कामास होते. मंगळवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास कारखान्यात काम करीत असताना अचानक चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले होते. मार्केटिंग व्यवस्थापक हरपालसिंग यांनी त्यांना तातडीने सिक्ससिग्मा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.