शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

हॉकर्स, टपरीधारकांचा मनपावर ‘खबरदार’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:26 IST

‘लाठी, गोली खायेंगे, गाडी, टपरी, टोकरी वही लगायेंगे’, ‘हॉकर्स झोन फेक दो’, ‘ग्राहक तेथे हॉकर्स झोन झालेच पाहिजेत’... या घोषणा देत शहरातील हॉकर्स, टपरीधारक यांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढत प्रस्तावित हॉकर्स झोनला जोरदार विरोध दर्शविला. दरम्यान, हॉकर्स व टपरीधारकांच्या सर्व संघटना मिळून गठित करण्यात आलेल्या कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत यापुढे व्यापक आंदोलनाचे संकेत दिले.

नाशिक : ‘लाठी, गोली खायेंगे, गाडी, टपरी, टोकरी वही लगायेंगे’, ‘हॉकर्स झोन फेक दो’, ‘ग्राहक तेथे हॉकर्स झोन झालेच पाहिजेत’... या घोषणा देत शहरातील हॉकर्स, टपरीधारक यांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढत प्रस्तावित हॉकर्स झोनला जोरदार विरोध दर्शविला. दरम्यान, हॉकर्स व टपरीधारकांच्या सर्व संघटना मिळून गठित करण्यात आलेल्या कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत यापुढे व्यापक आंदोलनाचे संकेत दिले.महापालिका आयुक्तांनी शहरातील सहाही विभागात प्रत्येकी पाच हॉकर्स झोन कार्यरत करण्याचे आदेश विभागीय अधिकाºयांना दिले आहेत तसेच यापुढे कोणताही बदल हॉकर्स झोनमध्ये होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉकर्स, टपरीधारक व रस्त्यावरील विक्रेत्यांच्या संघटनांनी एकत्र येत कृती समिती गठित केली आणि मंगळवारी (दि.१) महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनवर मोर्चा आणला. या मोर्चाचे नेतृत्व सुनील बागुल, शांताराम चव्हाण, शिवाजी भोर, शशिकांत उन्हवणे, सय्यद युनूस, बाळासाहेब उगले, पुष्पा वानखेडे, सुनील संधानशिव, दिनेश जाधव, नीलेश कुसमोडे, नवनाथ ढगे, संदीप जाधव आणि जावेद शेख यांनी केले. बी. डी. भालेकर हायस्कूलपासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी हॉकर्स झोनविरुद्धचे फलक हाती घेत फेरीवाल्यांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला व एकतर्फी हॉकर्स झोनचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. मोर्चा मुख्यालयावर येऊन धडकल्यावर प्रमुख पदाधिकाºयांची भाषणे झाली. हॉकर्स झोनमध्ये विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याचे दिलेले एकतर्फी आदेश रद्द करण्याची मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पदाधिकाºयांनी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. मंगळवारी आयुक्त उपस्थित नसल्याने त्यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा गाºहाणे मांडण्यात येणार असल्याचे पदाधिकाºयांनी यावेळी स्पष्ट केले.