शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या विहिरीचे पाणी केले गावासाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 18:02 IST

विरगाव : गावाला भेडसावणारी भीषण पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी आपल्या शेतातील दोन एकरवरील भाजीपाला पीक संपूर्णपणे सोडून देत गावाला स्वमालकीच्या विहिरीचे पाणी उपलब्ध करून देण्याचे काम डोंगरेज (ता.बागलाण) येथील महिला सरपंच सुमन खैरनार यांनी केले आहे. यांच्या या औदार्यामुळे गावाची तहान भागली असतांनाच शासनाचा गावावर टँकरपायी होणारा हजारो रु पयांचा खर्चही वाचला आहे.

ठळक मुद्देबागलाण : डोंगरेज गावाची भागली तहान ; सुमन खैरनार यांचे औदार्य

विरगाव : गावाला भेडसावणारी भीषण पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी आपल्या शेतातील दोन एकरवरील भाजीपाला पीक संपूर्णपणे सोडून देत गावाला स्वमालकीच्या विहिरीचे पाणी उपलब्ध करून देण्याचे काम डोंगरेज (ता.बागलाण) येथील  सरपंच सुमन खैरनार यांनी केले आहे. यांच्या या औदार्यामुळे गावाची तहान भागली असतांनाच शासनाचा गावावर टँकरपायी होणारा हजारो रु पयांचा खर्चही वाचला आहे.येथूनच जवळ असलेल्या सुमारे १५०० लोकसंख्या असलेल्या डोंगरेज या गावात सद्यस्थितीत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावासाठी राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचा उद्भव या दुष्काळी परिस्थितीत पूर्णपणे कोरडा झाला असून गावपरिसरातील सर्वच विहिरींनीही माना टाकल्या आहेत. यामुळे गावातील महिला हंडाभर पाण्यासाठी अक्षरश: रानोमाळ भटकत आहेत.याच पार्श्वभूमीवर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी नुकतीच गावाला भेट देऊन पाणीसमस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यात विहीर अधिग्रहणासह टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे या बाबींवर चर्चा करण्यात आली. मात्र यात समाधानकारक मार्ग निघत नसल्याने सरपंच सुमन खैरनार यांनीच स्वमालकीच्या विहिरीचे पाणी गावाला उपलब्ध करून सामाजिक दायित्व निभवावे अशी विनंती तहसीलदारांनी केली. या विनंतीला सरपंच खैरनार यांनी तात्काळ संमती देत शेतीचे पाणी बंद करून गावाला पाणी उपलब्ध करून दिले आहे.शेतात दोन एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या भाजीपाला पिकाला तिलांजली देण्याचा निर्णय त्यांनी यासाठी घेतला आहे. अर्धा किलोमीटर पाईपलाईन द्वारे हे पाणी गावाच्या विहिरीत टाकले जात असून गावातील सर्व भागाला समान व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुमनबाई जातीने लक्षही देतांना दिसून येत आहेत. त्यांच्या या पुढाकारामुळे गावाची पाणीसमस्या दूर झाली असून टँकरमुळे गावावर होणारा हजारो रु पयांचा खर्चही वाचला आहे. तसेच परिसरातील अन्य गावातील राजकारणी व जनता यांनाही यामाध्यमातून एक चांगला संदेश देण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.गावाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. सरपंच म्हणून हीच जबाबदारी स्वीकारत शेतातील पिकाला दुर्लक्षित करून गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे गावाची तहान भागली असून एक चांगले सामाजिक कार्य केल्याचा आनंदही यातून पदरी पडला आहे.सुमन खैरनार (सरपंच, डोंगरेज)(फोटो १० सुमन खैरनार)