हरसूल : येथील मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला आहे. सलग दोन दिवस चार दुकाने फोडून ऐवज लंपास केल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही दुकाने, घरफोडीच्या घटना घडल्या असून, त्याचा अद्याप तपास लागला नसल्याने पोलिसांविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच सुरेंद्र देवरगावकर व लक्ष्मण महाले यांचे किराणा दुकान फोडून वस्तू लंपास करण्यात आल्या. यामुळे दुकानदारामध्ये संतापाचे वातावरण आहे. यासंबंधी सहायक पोलीस निरीक्षक रावसाहेब कीर्तीकर, नरेंद्र खैरनार, राजेंद्र सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात येणार आहे. (वार्ताहर)
हरसूल येथे दोन दिवसात ४ दुकाने फोडली
By admin | Updated: December 4, 2014 23:59 IST