शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

हरसूल नामको बँकेत धाडसी चोरीचा प्रयत्न

By admin | Updated: September 2, 2014 01:14 IST

हरसूल नामको बँकेत धाडसी चोरीचा प्रयत्न

हरसूल : येथील बाजारपेठेतील चार दुकाने फोडल्याची घटना ताजी असताना चोरांनी थेट ‘नामको’ बँकेच्या हरसूल शाखेतील अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असताना सुद्धा पाठीमागील खिडकी तोडून मुख्य तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.त्यामुळे हरसूल येथील बाजारपेठेत चोरीची दहशत कायम राहिली, तर सायंकाळी मुख्य बाजारपेठेत हरसूल पोलिसांनी सशस्त्र दलासह संचलन केल्यानंतर अवस्था काही तासात रात्री नाशिक मर्चंट को-आॅप. बँक फोडून चोरट्यांनी हरसूल पोलिसांसमोर आव्हान कायम ठेवले आहे.आज सकाळी नामको बँकेच्या येथील शाखेचे व्यवस्थापक टी. के. सूर्यवंशी यांनी बँक उघडल्यानंतर पाठीमागील खिडकी तुटली असल्याचे लक्षात येताच पोलिसांना खबर दिल्याने पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करत श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण केले.त्यानुसार फिंगर प्रिंट घेऊन हरसूल पोलिसांनी संशयितांची धरपकड, सुरूकेली, तर श्वानाला बँकेच्या बाहेर माग काढता आले नाही, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली आहे, तर चोरट्यांनी बँकेत यशस्वी प्रवेश करत बॅटरी रुममधील सर्व कनेक्शन बंद करून तिजोरी खोलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असल्याची माहिती व्यवस्थापक टी. के. सूर्यवंशी यांनी दिली. चोरट्यांनी अलार्म वायर व सीसीटीव्हीच्या वायरी तोडल्यानंतर तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला व बँक कर्मचारी बँक बंद झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद करतात घटना झाली तेव्हा कॅमेरे बंद होते, तरीसुद्धा चोरट्यांनी अलार्म व सीसीटीव्हीच्या वायरी तोडल्या त्यामुळे चोर हे भुरटे आहे की माहितगार आहे याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक मोक्षदा पाटील, हरसूल मधे तळ ठोकून आहे, तर रावसाहेब कीर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीसचे पथकाने ठिकाणी धाडसत्र चालू केले आहे. (वार्ताहर)