शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

हापूस आंब्याची अमेरिकेत निर्यात सुरू

By admin | Updated: April 8, 2017 00:07 IST

फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेला सुरू झाली आहे.

 शेखर देसाई लासलगावफळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणचा हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेला सुरू झाली आहे. वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतातील हापूस आंब्याची अमेरिकावारी सुरू झाली आहे. लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून हापूस आंब्यावर विकिरण प्रक्रि या होऊन पहिला कंटेनर शुक्रवारी अमेरिकेला रवाना करण्यात आला.फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण देत युरोपीय महासंघाने भारतातून आयात होणाऱ्या हापूस आंब्यावर २०१३ साली बंदी घातल्याने, फाळांचा राजा असलेल्या हापूसचे आता काय होणार, ही चिंता होती; पण आता ही चिंता कायमस्वरूपी मिटली असून, गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने हा आंबा आता अमेरिकेचा दिशेने कूच करू लागला आहे. पहिल्याच दिवशी साडेसात मेट्रिक टन हापूस आंबा रवाना झाला आहे.अमेरिकेला पाठविण्यात येणाऱ्या हापूस आंब्यावर लासलगाव येथे विकिरण प्रक्रिया केली जाते. या हंगामातील पहिली विकिरण प्रक्रि या साडेसात मेट्रिक टन आंब्यांवर करण्यात आली. एकूण ७२५० बॉक्स हापूस आणि केशर आंबा हंगामाच्या सुरुवातीला विकिरण करून अमेरिकेला पाठविण्यात आले. अमेरिकेला जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.येथील कृषक या पथदर्शक विकीरण प्रक्रिया प्रकल्पात अ‍ॅग्रोसर्जईरेडिएटर्स (इंडिया) प्रा. लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापक प्रणव पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव येथील कृषकचे व्यवस्थापन निवासी अधिकारी महेंद्र अवधानी व संजय आहेर हे काम पहात आहेत. अमेरिकेला पाठविण्यात येणाऱ्या हापूस आंब्यावर लासलगाव येथे विकिरण प्रक्रिया केली जाते.