कार्यक्रमाची सुरुवात ‘राम कृष्ण हरी’ या गजराने करण्यात आली. त्यानंतर ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’, ‘विठूमाउली तू माउली जगाची’ ही गाणी वाद्यांच्या स्वरातून सादर झाली. या अभंगानंतर ‘विठ्ठलाच्या पायी वीट’, ‘विठ्ठल आवडी प्रेमभाव’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘कानडाऊ विठ्ठलू’, ‘सुंदर ते ध्यान’ ही गाणी सादर करण्यात आली. त्यानंतर पंढरीच्या वारीत होणारा विठ्ठलाच्या नामाचा जयघोष ‘अवघे गरजे पंढरपूर’ या गाण्यातून करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता ‘अवघा रंग एक झाला’ या गाण्याने करण्यात आली. या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे शब्दांशिवाय, वाद्यांच्या सुरातून अभंगवाणीची ही मैफल रंगली. कार्यक्रमात व्हायोलिन तुषार डुबे, बासरी विधान बैरागी, तबला तेजस कंसारा, वैभव काळे, हार्मोनियम ऋतुजा वाणी, पखवाज देवेंद्र दाणी, तालवाद्य सागर मोरस्कर आणि कीबोर्ड किरण सानप व निवेदन बागेश्री पारनेरकर यांनी संगीतसाथ दिली.
ऑनलाईनच्या माध्यमातून हरिनामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST