शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

हरणबारी ,केळझर मधून रब्बीसाठी दोन आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 16:50 IST

सटाणा:बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तन सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरिक्षत करण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देयेथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक घेण्यात आली .बैठकीस मालेगाव येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश चौधरी ,उपअभियंता ई.बी.शेवाळे ,उपअभियंता अभिजित रौंदळ,शाखा अभियंता आर.बी.सूर्

सटाणा:बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तन सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरिक्षत करण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पातून सुमारे २ हजार १५ हेक्टर या रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते तर केळझर मध्यम प्रकल्पातून १ हजार१८० हेक्टर रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते .यंदा या रब्बी हंगामासाठी शेतकº्यांनी पाण्याच्या तीन आवर्तनाची मागणी केली होती .मात्र पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणात वाढ झाल्याने रब्बीसाठी दोनच आवर्तनाचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी कार्यकारी अभियंता चौधरी यांनी स्पष्ट केले .शेतकर्यांच्या मागणीनुसार हरणबारी धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले असून२५० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येणार आहे .उर्वरित पाण्याचे दुसरे आवर्तन २५ फेब्रुवारीला सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला .तर केळझर धरणातून येत्या १० फेब्रुवारीला पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.यासाठी १५४ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे .दरम्यान आमदार दिलीप बोरसे यांनी रब्बीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कसे पोहचेल यासाठी आवश्यक ठिकाणी कालव्यांची दुरु स्ती करावी .तसेच रब्बी पिकासाठी ठरल्याप्रमाणे दिले जाणारे दोन्ही आवर्तने शेवटच्या शेतकº्याच्या शेत पर्यंत कसे पोहचेल यासाठी नियोजन करावे .जेणेकरून पेरा केले पिक हातात येईल अशा सूचना यावेळी संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या .बैठकीस आदर्श गाव किकवारीचे प्रणेते केदाबापू काकुळते ,बाळासाहेब भदाणे ,पांडुरंग सोनवणे ,माधवराव सोनवणे ,जनार्दन सोनवणे ,भास्कर सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते .असा आहे रब्बीचा सिंचन आराखडा ...हरणबारी धरण पाणी साठा ११६६ दशलक्ष घनफूट ,पैकी बाष्पीभवन तुट ११७ दशलक्ष घनफूट ,पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ३९० दशलक्ष घनफूट ,रब्बी हंगामासाठी ६५९ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे.केळझर धरणात ५७२ दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे .पैकी बाष्पीभवन तुट ८६ दशलक्ष घनफूट ,पिण्यासाठी १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे . ३८५दशलक्ष घनफूट पाणी रब्बीसाठी आरिक्षत करण्यात आले आहे .