शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

हर हर महादेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:09 IST

हर हर महादेव, त्र्यंबकेश्वर भगवान की जय, असा जयघोष करीत शेकडो शिवभक्तांनी श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वताची दुसºया सोमवारची फेरी पूर्ण करून दर्शनाच् ाा लाभ घेतला. सोमवारनिमित्त जिल्हाभरातून येथे आलेले भाविक मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी झाले होते. महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला.

त्र्यंबकेश्वर : हर हर महादेव, त्र्यंबकेश्वर भगवान की जय, असा जयघोष करीत शेकडो शिवभक्तांनी श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वताची दुसºया सोमवारची फेरी पूर्ण करून दर्शनाच् ाा लाभ घेतला. सोमवारनिमित्त जिल्हाभरातून येथे आलेले भाविक मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी झाले होते. महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विधिवत पूजन व महाआरती करण्यात आली. सोमवार असल्याने भाविकांनी पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरात दर्शनासाठी येणाºया भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. श्रावणी सोमवार निमित्ताने मंदिर व परिसरात विविध पूजा, अभिषेक करण्यासाठी भाविकांनी मंदिरातील ब्रह्मवृंदाकडे गर्दी केली होती. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने मंदिराकडे येणाºया सर्व रस्त्यांवर लोखंडी बॅरिकेडिंग करून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. या रस्त्याने केवळ पायी जाणाºया भाविकांना सोडले जात होते. तिसºया सोमवारी रक्षाबंधन येत असल्याने भाविकांनी दुसºया सोमवारीच ब्रह्मगिरीला फेरी मारली. यामुळे यंदाच्या श्रावणातील दुसºया सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे गर्दी वाढली होती. तिसºया सोमवारी चंद्रग्रहण असल्याने रात्रीची फेरी मारण्यास अनेक भाविक उत्सुक नसल्याची चर्चा होती. फेरी मार्गावर अनेक स्वयंसेवी संघटनांनी खिचडी व केळी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. कार्यकर्त्यांचा उत्साहही दांडगाहोता. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना चिखलाचा त्रास जाणवला नाही.श्रीक्षेत्र पहाडेश्वर मंदिरात गर्दीब्राह्मणगाव : येथील उत्तरेकडील प्रसिद्ध शिवमंदिर श्रीक्षेत्र पहाडेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी दर्शन घेतले. या परिसरात पावसाळी वातावरण व डोंगर परिसरात हिरवळ असल्याने निसर्गसौंदर्य बघण्यासाठीही भाविकांची गर्दी अधिकच वाढली आहे. प्रत्येक सोमवारी भाविक येथे हजेरी लावतात. वातावरण आल्हाददायक असल्याने व अचानक पावसाच्या श्रावण सरी येत असल्याने लहान बालके पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत. ब्राह्मणगाव येथे एकूण आठ- नऊ शिव मंदिरे आहेत. परिसरातील भाविक जवळच्या शिव मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत. पावसाचा आनंद घेत प्रदक्षिणा करण्यास जात होते, तर सकाळपर्यंत परतत होते. येताना मात्र आपापल्या ग्रुपने अत्यंत थकलेल्या अवस्थेत परतत होते. रात्री अत्यंत उत्साहाने व आनंदाने पळतच जाणारे भाविक प्रदक्षिणा मार्गावरील  चढ-उतार, दºयाखोºयातून उतरु न अत्यंत थकलेल्या अवस्थेत परतताना दिसत होते.रात्री उत्साहात गेले ते हेच का, असा प्रश्न पडत होता.