शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आनंदसरी बरसल्या

By admin | Updated: June 2, 2017 02:03 IST

नाशिक : जूनच्या पहिल्याच दिवशी पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागांत हजेरी लावून शेतकऱ्यांना आनंदीकेले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जूनच्या पहिल्याच दिवशी पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागांत हजेरी लावून शेतकऱ्यांना आनंदी केले आहे. या पावसाने सुरगाणा, निफाड, चांदवड व मालेगावला जोरदार हजेरी लावली .सुरगाणा व तालुका परिसरात आज पावसाळ्यातील पहिल्याच दिवशी पावसाचे जोरदार आगमन झाले. पावसामुळे वातावरण थंड झाल्याने उष्णतेपासून सुटका मिळाली. परंतु घाटमाथ्यावरील बोरगाव परिसरात पाऊस झाला नाही.गेल्या काही दिवसांपासून येथील उष्णतेत वाढ झाली होती. काही वेळा ढग भरून येत परंतु पाऊस न होता उलट उष्णतेत वाढ झाली होती. आजही सकाळपासूनच वातावरणात उष्णता होती. दुपारपर्यंत सूर्य तळपत होता. दुपारी दोन वाजेच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन ढग गरजू लागले व जोरदार वारा वाहू लागला. याचवेळी पावसाचे जोरदार आगमन झाले. पाऊस सुरू असताना वीज चमकत होती. भर दुपार असूनही संध्याकाळ झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरू झाला नव्हता.जूनच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली. सुरगाणा शहरासह तालुक्यात उंबरठाण येथेही जोरदार पाऊस झाला. घाटमाथ्यावरील बोरगाव व परिसरात पाऊस झाला नाही. बाऱ््हे व परिसरात हलकासा पाऊस झाला. येथून जवळच असलेल्या गुजरातमधील सापुतारा या पर्यटनस्थळीदेखील पाऊस झाला.शहरापासून जवळच असलेल्या मालगव्हाण येथे वादळी वाऱ््यामुळे भास्कर चव्हाण, रामचंद्र चौधरी, चित्रा चव्हाण आदींच्या घरांचे छप्पर उडून नुसान झाले.