शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गीतकार गुलजार यांना वाढदिवसानिमित्त स्वरमयी शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:01 IST

‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’, ‘तेरे बिना जिंदगी से’, ‘पानी पानी रे’, ‘नाम गुम जायेगा’, यांसारख्या गीतकार गुलजार यांच्या एकापेक्षा एक सरस गाजलेल्या गीतांची मोहिनी नाशिककरांमध्ये पहावयास मिळाली. निमित्त होते, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने गीतकार राम पुरणसिंह कालरा ऊर्फ गुलजार यांच्या वाढदिवसानिमित्त कुसुमाग्रज स्मारकात आयोजित ‘जिंदगी गुलजार हैं’ या मैफलीचे.

नाशिक : ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’, ‘तेरे बिना जिंदगी से’, ‘पानी पानी रे’, ‘नाम गुम जायेगा’, यांसारख्या गीतकार गुलजार यांच्या एकापेक्षा एक सरस गाजलेल्या गीतांची मोहिनी नाशिककरांमध्ये पहावयास मिळाली.निमित्त होते, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने गीतकार राम पुरणसिंह कालरा ऊर्फ गुलजार यांच्या वाढदिवसानिमित्त कुसुमाग्रज स्मारकात आयोजित ‘जिंदगी गुलजार हैं’ या मैफलीचे. शनिवारी (दि.१८) रंगलेल्या या मैफलीत उपस्थित श्रोत्यांच्या मनावर असलेले गुलजार यांच्या रचनांचे गारुड पहावयास मिळाले. गायक रागिणी कामतीकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात गुलजार यांनी रचलेल्या हिंदी गीतांच्या रचना सादर करून मैफल उत्तरोत्तर खुलवत नेली. त्यांना सहगायक नेहा मूर्ती यांनी सुरेख साथ केली.‘मैं इक सदी से बैठी हूँ’ या गीताने मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर ‘हमने देखी हैं उन आँखो की खुशबू’ हे गीत सादर करताच उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतरच्या ‘मेरी मां मुझे जा ना कहो’, ‘वो शाम कुछ अजीब थी’, ‘ना जिया लागे ना’, ‘तुम पुकारलो’, ‘रु के रु के से कदम’, ‘दोन नैनों में आंसू भरे हैं’, ‘सूरमयी अँखियों में’, ‘आप की आँखो में कुछ’, ‘मेरा कुछ सामान’ अशा गीतांनी मैफलीत रंग भरले. आदित्य कुलकर्णी (तबला), अ‍ॅड. प्रमोद पवार (संवादिनी) यांनी साथसंगत केली. श्रीपाद कोतवाल यांनी निवेदन केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक