शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Updated: August 27, 2016 23:20 IST

स्नेहमेळावा : येवला विभागीय कार्यालयाचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात

 येवला : येथील बालगोपाळांपासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीत ‘लोकमत’च्या येवला विभागीय कार्यालयाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा नगर - मनमाड रोडवरील कन्यादान लॉन्सवर मंगलमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, सहकार नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख आदिंसह विविध मान्यवरांनी निवासी संपादक किरण अग्रवाल व सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांना शुभेच्छा दिल्या.प्रारंभी लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी तसेच १९८७च्या स्वातंत्र्य समराचे थोर सेनानी तात्या टोपे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन किरण अग्रवाल, बी.बी. चांडक, रमेशचंद्र पटेल, प्रभाकर झळके, उषाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.येवल्याची नवीन ओळख म्हणून नावारूपास आलेला फेटा येथील श्रीकांत खंदारे यांनी सर्व अतिथींना बांधला. सेनापती तात्या टोपे शैक्षणिक संकुलाचे प्रा. बाळासाहेब हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एन्झोकेम विद्यालयातील विद्यार्थिनींनी सुश्राव्य स्वागतगीत व जयोस्तुते गीत सादर करून उपस्थितांची मन जिंकली. याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील ३९ गुणवंतांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला. येवला या ऊर्जा देणाऱ्या ऐतिहासिक शहरामध्ये आपापल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नागरिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी लोकमतने केलेला गौरव ही एक अतिशय आनंददायी बाब असल्याचे प्रतिपादन लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांनी केले.येवला शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील सर्वसामान्य घटकातील जनतेची नाळ ओळखून प्रत्येक क्षेत्रात वेळोवेळी घडणाऱ्या घटनाचा वेध घेऊन सर्वच स्तरातील लोकांना कसा न्याय देता येईल यासाठी लोकमत प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. येवला शहरातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान केल्याने तो खऱ्या अर्थाने लोकमतचाच सन्मान झाला. सामाजिक बांधीलकीचा वारसा जपणारे लोकमत हे केवळ वृत्तपत्र नसून ती एक चळवळ म्हणून पुढे आल्याची भावना लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी व्यक्त केली. विकासाशी संबंधित प्रत्येक बाबतीत लोकमत येवलावासीयां-सोबत राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी आपल्या मिश्कील भाषणात विविध उदाहरणे देऊन लोकमतबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्ताविक लोकमतचे तालुका प्रतिनिधी दत्ता महाले यांनी, तर सूत्रसंचालन बाळासाहेब सोमासे यांनी केले.या सोहळ्यास मनोज दिवटे, सुभाष पाटोळे, संजय कुक्कर, रामेश्वर हाबडे, किशोर सोनवणे, बाळू पहिलवान शिंदे, बापू गाडेकर, मुकेश लचके, अविनाश कुलकर्णी, चंपा रणदिवे, नीलिमा भागवत आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)