शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

नवीन वर्षात सुखावह प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:15 IST

नाशिक महापालिकेच्या बससेवेला अखेरीस नव्या वर्षात प्रारंभ हेाणार असून, २६ जानेवारीपासून पन्नास बसेस रस्त्यावर येणार आहेत. आयटीएमएस म्हणजेच इंटीलेजंट ...

नाशिक महापालिकेच्या बससेवेला अखेरीस नव्या वर्षात प्रारंभ हेाणार असून, २६ जानेवारीपासून पन्नास बसेस रस्त्यावर येणार आहेत. आयटीएमएस म्हणजेच इंटीलेजंट ट्रफिक मॅनेजमेंटसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन तिकीट काढणे किंवा बुकिंगसह असलेली ही पहिल्याच प्रकारची सोय असणार असल्याने या सेवेविषयी उत्कंठा आहे.

- दोनशे सीएनजी तर पन्नास मिनी डिझेल बस सुरूवातीला असतील. पाच टप्प्यांत ही सेवा असणार आहे. सुरुवातीला नऊ मार्गांवरून ही सेवा सुरू होईल.

- दीडशे इलेक्ट्रिकल बस सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र, केंद्र शासनाने पन्नास बससाठीच अनुदान देण्याचे धोरण ठरवल्याने तूर्तास हा विषय प्रतीक्षेत आहे.

---------

एचएएलला नाइट पार्किंग

नाशिकसाठी ओझर विमानतळावरून हवाई सेवा सुरू झाल्यानंतर आता या ठिकाणी आता नाइट पार्किंगला परवानगी मिळाली आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून हा विषय प्रतीक्षेत होता.

राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर एचएएल व्यवस्थापनाकडे हा विषय गेला हेाता. त्यास यंदा मंजुरी मिळाली. सुरुवातीला या ठिकाणी सहा विमानाने रात्री राहू शकतील. या सेवेमुळे नाशिकमध्ये अशी विमाने प्रवासी घेऊन येतील आणि नंतर सकाळी ते प्रवासीही नेणार असल्याने अनेक शहर, राज्य आणि आंतरराष्ट्रीय शहरांशी नाशिक जोडले जाऊ शकेल.

-----------

शहरात अडीचशे कोटी रुपयांचे रस्ते

- नाशिक शहरात अडीचशे कोटी रुपयांचे रस्ते करण्यात येणार असून, बहुतांश रस्ते हे नाशिक शहरातील कॉलनी आणि ग्रामीण भागात असणार आहेत. त्यामुळे मोठी गैरसोय दूर हेाणार आहे.

- नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात १२ नवीन पदव्युत्तर शिक्षणक्रम सुरू होणार असून, त्यामुळे २४ डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिकेने मुंबईच्या सीपीएसशी सलग्न शिक्षणक्रम असतील. त्यामुळे महापालिकेला मनुष्यबळाची मदत होत आहे.

- शहरातील वाहनतळाची कोंडी फोडण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट पार्किंग नवीन वर्षात सुरू होणार आहे. २८ ऑन स्ट्रीट आणि पाच ठिकाणी ऑफ स्ट्रीट स्वरूपाची ही पार्किंग असेल. नागरिकांना ॲपवरून वाहनतळाची जागा आरक्षित करता येणार आहे.

- शहरातील प्रलंबित सीसीटीव्ही बसविण्याच्या कामांना नव्या वर्षात प्रारंभ होणार आहे. शहरातील ४६ चौक म्हणजेच ज्या ठिकाणी सिग्नल्स आहेत, तेथे सर्व प्रथम सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. त्यानंतर, शहरातील अन्य भागात आणि महत्त्वांच्या मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे.

------

नाशिक शहरात सीएनजीचे इंधन

केंद्र शासनाच्या धोरणानुसार आता नाशिकमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस एजन्सी ही शासन अंगीकृत संस्था सीएनजी गॅस आणत असून, त्यामुळे वाहनांसाठी पर्यावरणस्नेही इंधन उपलब्ध हेाणार आहे. शहरात दोन ठिकाणी सीएनजी पंप सुरू झाले असले, तरी द्रव रूप गॅस भरून आणावा लागतो. पालघर येथून नाशिक शहरातील विल्होळी येथे गॅस वहनासाठी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे थेट नाशिकला गॅस येईल. विशेष म्हणजे गॅस केवळ वाहनांसाठीच नाही, तर घरगुती गॅससाठीही त्याचा वापर होऊ शकेल. त्यासाठी मेाठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये नोंदणीही सुरू झाली आहे.

----