नाशिक : अंजनेरीहून पेटवून आणलेली मशाल, भगवे ध्वज, सजविलेल्या ट्रॅक्टरवर हनुमानाची विलोभनीय गदाधारी मूर्ती, वाजंत्री, ढोल-ताशे, डीजेवर सुरू असलेली प्रभु श्रीरामचंद्र व हनुमान यांची भक्तिगीते याचबरोबरच ‘पवनपुत्र हनुमान की जय’चा जयघोष अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शहरातील पारंपरिक मार्गावरून शनिवारी हनुमानाची मिरवणूक काढण्यात आली़ त्र्यंबकेश्वरच्या श्रीराम शक्तिपीठ ब्रह्मचारी आश्रमाने ही मिरवणूक काढून एका नव्या परंपरेची मुहूर्तमेढ रोवली आहे़ दूधबाजारापासून सुरू झालेल्या मिरवणुकीच्या पुढे हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी येथून पेटवून आणलेली मशाल होती़ या मिरवणुकीत सहभागी झालेल्या भक्तांच्या हातात भगवे झेंडे होते़
हनुमानाची मिरवणूक
By admin | Updated: April 5, 2015 00:41 IST