शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले कलाकारांचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:27 IST

कलाकार हा मुळातच संवेदनशील असतो. समाजातील संकटकाळी मदतीला धावून येतो. सांगली, कोल्हापूर येथील महापुराने तेथील हजारो माणसांच्या उद््ध्वस्त संसारांना हातभार लावण्याच्या इराद्याने नाशिकच्या चित्रकार, शिल्पकारांनी मांडलेल्या त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनातील कलाकृती विकत घेण्याचे औदार्य दाखवत नाशिकच्या दानशुरांनी कलाकारांच्या कलेचा सन्मान करतानाच पूरग्रस्तांच्या मदतनिधीत योगदान दिले.

नाशिक : कलाकार हा मुळातच संवेदनशील असतो. समाजातील संकटकाळी मदतीला धावून येतो. सांगली, कोल्हापूर येथील महापुराने तेथील हजारो माणसांच्या उद््ध्वस्त संसारांना हातभार लावण्याच्या इराद्याने नाशिकच्या चित्रकार, शिल्पकारांनी मांडलेल्या त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनातील कलाकृती विकत घेण्याचे औदार्य दाखवत नाशिकच्या दानशुरांनी कलाकारांच्या कलेचा सन्मान करतानाच पूरग्रस्तांच्या मदतनिधीत योगदान दिले.कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे नाशिकच्या अनेक चित्रकार, शिल्पकारांनी एकत्र येऊन त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ रविवारी भारत टाकेकर, सीमा पाटील, श्वेता मालपाणी आणि वेदिका होळकर यांनी केले. या प्रदर्शनातील सर्व छायाचित्रे आणि शिल्प पाच हजार रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आली असून त्यातून मिळणारा सर्व निधी हा सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. सात चित्रकृतींना दानशूर नाशिककरांनी विकत घेत सामाजिक योगदान दिले. या प्रदर्शनात नाशिकच्या प्रथितयश कलाकारांच्या ५० पेक्षा अधिक कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. ३० आॅगस्टपर्यंत चालणारे हे प्रदर्शन दररोज सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाहता येणार आहे. तरी नाशिककरांनी मदतीचा हात पुढे करीत आपला दिवाणखानादेखील सजवावा, असे आवाहन सर्व कलाकारांच्या वतीने करण्यात आले आहे.गायत्री परिवारातर्फे मदतगायत्री परिवार युगनिर्माण योजना ट्रस्टच्या वतीने कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या. यामध्ये पौष्टीक खाद्य सामुग्री, २०० किलो तांदूळ, २०० किलो तूरदाळ, मिठ तसेच विविध प्रकरचे कपडे अशा सुमारे तीन लाख रुपयांचे साहित्य पाठविण्यात आले. याप्रसंगी श्रीकृष्णतीर्थ आश्रमाचे स्वामी रामतिर्थ, गायत्री परिवाराचे कार्यकर्ते मनीभाई पटेल, जीवनभाई राठोड, जयगोविंद पांडे, विनायक गिल्लूरकर, रवींद्र वाघ, सयाजी गांगुर्डे यांचे सहकार्य लाभले. तसेच युवा मंडळाचे कार्यकर्ते राकेश पटेल, प्रणवभाई पुरोहित, रवि पटेल, विशाल नाकराणी, अमृतभाई पटेल यांचेही सहकार्य लाभले. यावेळी गायत्री परिवार युग निर्माण योजना ट्रस्टचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मदतीत बालगोपाळांचाही सहभागसिडको परिसरातील चेतनानगर येथील वैभव देवरे व सोनल देवरे यांची ११ वर्षीय मुलगी तेजस्वी व सहा वर्षीय मुलगा शाहू यांनी त्यांचे खाऊचे जमा केलेले वर्षभराचे पैसे पूरग्रस्तांना देऊ केल्याने त्यांचे परिसरातील राहिवाशांकडून कौतुक करण्यात येत आहे. या बहीण-भावाने त्यांना मिळालेली खाऊची रक्कम दिली. वर्षभराची केलेली बचत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पूरग्रस्तांसाठी देऊ केली. कुमारी तेजस्वी वैभव देवरे वय ११ व चैतन्य वैभव देवरे वय ६ वर्षे या चिमुकल्यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुराच्या बातम्यांनी ही व्यथित झाली. शिवाय ठिकठिकाणांहून पूरग्रस्तांना मदतीचा ओघही सुरू झालेला. त्यामुळे पूरग्रस्त लहान मुलांना आपणही मदत करावी, असा विचार त्यांच्या मनात आला.

टॅग्स :floodपूरNashikनाशिक