शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या संस्था होणार अनुदानित

By admin | Updated: August 2, 2014 01:21 IST

शिवाजीराव मोघे : सातपूर येथील ‘नॅब’च्या कार्यक्रमात केली घोषणा

सातपूर : देशात अपंगांसाठी भरीव कामगिरी करणाऱ्या सर्वाधिक संस्था आपल्या राज्यात असून, बहुतांश विना अनुदानित तत्त्वावर काम करीत आहेत. अशा विना अनुदानित संस्था अनुदानित करण्यासाठी शासनपातळीवर लवकरच निर्णय घेण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली.नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड (नॅब) युनिट महाराष्ट्र संचलित सातपूर येथील चंद्रभागाबाई नरसिंगदासजी चांडक (सिन्नर) बहुविकलांग केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मोघे पुढे म्हणाले, नॅबच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित असून, या मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. नॅब या संस्थेने विश्वासार्हता मिळविली असल्याने संस्थेला समाजाचा हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बहुविकलांग विद्यार्थ्यांनी स्त्रीभू्रणहत्त्येवर नाट्य, मल्लखांब प्रात्यक्षिके, बहुविकलांग नृत्य यांसह विविध सांस्कृतिक सादर केलेले पाहून मंत्री शिवाजी मोघे भारावून गेले.यावेळी द्वारकानाथ चांडक, किशोर केला, सुभाष झंवर, सीएट कंपनीचे राधेश्याम केडिया, अभय पंचाक्षरी, उद्योजक राजेश उपासनी आदि देणगीदारांचा तसेच विविध प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच बहुविकलांग विद्यार्थ्यांना सीडी प्लेअरचे वाटपही करण्यात आले. कर्णबधिर, अंध व बहुविकलांग प्रकल्पाची माहिती डेफब्लार्इंड प्रकल्पाचे अध्यक्ष अशोक बंग यांनी दिली. प्रास्ताविक नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक राधाकिसन चांडक होते.यावेळी व्यासपीठावर नॅब इंडियाचे सचिव के. रामकृष्णन, तसेच भारत परदेशी, पद्मश्री निरंजन पंड्या, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर. डी. शिंदे, आदिवासी विकास महामंडळाचे आयुक्त बाजीराव जाधव, अपंग कल्याण आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, समाजकल्याण उपआयुक्त राजेंद्र कलाल, काशीनाथ गवळे, समाजकल्याण अधिकारी सतीश वळवी, वंदना कोचुरे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन सुगंधा शुक्ल यांनी केले. नॅबचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी आभार मानले. याप्रसंगी सूर्यभान साळुंखे, व्ही. एच. पाटील, मंगला कलंत्री, संजीवनी वंडेकर, प्राचार्य ज्योती आव्हाड, वर्षा चकोर, संपत जोंधळे, जितेंद्र गोस्वामी, अ‍ॅड. भागचंद चुडीवाल, सतीश ठाकरे, रजनी लिमये, विद्या फडके, डॉ. सिंधू काकडे आदिंसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)