शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयाच्या दारात रुग्णाची हेळसांड

By admin | Updated: August 19, 2014 01:25 IST

जिल्हा रुग्णालयाच्या दारात रुग्णाची हेळसांड

नाशिक : फीट आलेला रुग्ण दहा मिनिटे जिल्हा रुग्णालयाच्या दारात तळमळत पडूनही त्याला वेळेवर उपचार मिळाले नसल्याचा प्रकार आज सायंकाळी घडला़ या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, तसेच अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडले़ वेळ सायंकाळी पाचची. सतत येणाऱ्या फीटने त्रस्त रुग्ण जिल्हा रुग्णालयात येतो़ चौकशी कक्षाजवळ जाऊन रुग्णालयात दाखल करून घेण्याची विनंती करतो़ परंतु डॉक्टर नसल्याचे सांगून त्याला हाकलून दिले जाते़ बाहेर पडत असतानाच त्याला फीट येते आणि रुग्णालयाच्या दरवाजातच तो कोसळतो़ तोंडाला फेस आणि हातपाय झाडत रुग्ण सुमारे दहा मिनिटे तेथेच तळमळत पडून असतो. त्याला पाहूनही तेथे उपस्थित आरोग्य सेवक, सुरक्षारक्षक त्याला काहीच मदत तर करत नाहीतच उलट हा नाटक करत असल्याचा टोमणा एकजण मारतो़ सुमारे दहा मिनिटे सर्वजण बघ्याची भूमिका घेतात़इतक्यात एका वृत्तपत्राचा छायाचित्रकार हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात टिपतो़ हे पाहताच मग मात्र संपूर्ण यंत्रणा तत्काळ हलते आणि स्ट्रेचर आणून त्याला उचलून रुग्णालयात दाखल केले जाते़ हा प्रकार येथेच संपत नाही़सुमारे अर्ध्या तासाने सदर रुग्णाचे फीट जाताच तो बऱ्यापैकी बोलू लागतो व उठून बसतो़ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची कागदपत्रे, केस पेपरवर पोलिसांकडे नोंद व सह्या घेण्यासाठी त्याच रुग्णाला पाठवले जाते़ त्यास चक्कर येत असताना, अनेक कर्मचारी केवळ गप्पा मारत बसले असतानाही रुग्णालाच कागदपत्रांची पूर्तता करण्यास लावले जाते़ असा अजब कारभार जिल्हा रुग्णालयात सुरू असून, त्याचा परिणाम अधिकाऱ्यांवर होत नसल्याचेही वास्तव आहे़ (प्रतिनिधी)