शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

वर्गणीतून अपंगाला मिळाली हातगाडी

By admin | Updated: June 12, 2016 23:35 IST

तरुणांची माणुसकी : रोजगारासाठी लावला हातभार; उपक्रमाचे होतेय कौतुक

 संजय शहाणे इंदिरानगरधूप, अगरबत्तीच्या पिशव्या खांद्यावर लटकवून उन्हातान्हात फिरणाऱ्या अपंग युवकाची परिस्थिती लक्षात आल्यानंतर येथील दहा मित्रांनी वर्गणी काढून स्टीलची हातगाडी भेट देत अपंग इसमाला उदरनिर्वाहासाठी हातभार लावल्याने या तरुणांचे परिसरात कौतुक होत आहे. गेल्या काही वर्षांपासून इंदिरानगर परिसरात कैलास निर्मल हे सिडकोत राहणारे अपंग गृहस्थ अगरबत्ती विकण्यासाठी दारोदार फिरतात. पत्नी, आई-वडील आणि मुलगी अशा कुटुंबातील सदस्यांची त्यांच्यावर जबाबदारी आहे. एका छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून, अपंग कैलास यांच्यावरच त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे. त्यामुळे सकाळी सकाळी दोन्ही खांद्यांवर आणि हातात पिशव्या घेऊन ते घरोघरी अगरबत्ती विक्री करण्यासाठी फिरत असतात. काही दिवसांपूर्वी खांद्यावर बोजा घेऊन कसाबसा चालणारा हा अपंग इसम सुनील अलिझाड या तरुणाच्या दृष्टीस पडला. बोझा घेऊन चालणेही अशक्य असल्याचे पाहून सुनील यांनी त्याची चौकशी केली. त्याच्या घरची परिस्थिती पाहून सुनील याने ही बाब आपल्या मित्रांना सांगितली. तेव्हा सर्वांनी अपंग कैलास यांना मदत करण्याचा निश्चिय केला. त्यानुसार कैलास निर्मल यांना हातगाडी बनवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुनील अलिझाड, संतोष नंदा, शिवाजी भालेराव, अनिल कर्पे, संजय शहाणे, आतिफ मिर्झा, रोहन पटेल, सचिन कोठारी, वैभव जाधव, अनिल जाधव, वानखेडे, नंदा, अस्लम शेख, अजीम शेख, अरुण खैरनार, मनिष जोशी आदि मित्रांनी वर्गणी काढून स्टीलची हातगाडी बनवून घेतली. सदर हातगाडी रविवारी निर्मल यांना देण्यात आली. सर्व सुविधांनीयुक्त अशी ही हातगाडी असून, ढकलण्यास सुलभ तसेच साहित्य ठेवण्यासाठी सुरक्षित जागा, ऊन, वाऱ्यापासून वाचण्यासाठीची व्यवस्था या ढकलगाडीला करण्यात आलेली आहे.