यापूर्वी विहिरींना पाणी असल्यामुळे नळ पाणी पुरवठा योजनेचे महत्त्व जाणवले नाही; परंतु आता भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे रानमळा परिसरात ग्रामपंचायतीने जलवाहिनी टाकावी, तूर्त खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी शांताबाई पवार, अनिता पवार आदींसह महिलांनी केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
कोट....
‘मनेगावसह २२ गाव पाणी पुरवठा योजनेत धोंडवीर नगर गावाचा समावेश असल्याने शासकीय टँकर मिळविण्यात अडचणी येतात. स्थानिक पातळीवर पाणी कसे देता येईल, याबाबत पदाधिकारी, प्रशासन प्रयत्न करीत आहेत.
- शिवाजी सोनवणे, सरपंच, धोंडवीरनगर.
फोटो - १२ सिन्नर मोर्चा
सिन्नर तालुक्यातील धोंडवीर नगर येथे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी हंडा मोर्चात सहभागी झालेल्या महिला व ग्रामस्थ.