नाशिक : नाशिकरोड विभागातील मौजे देवळाली येथील कैलासजी सोसायटीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हातोडा चालविला. महापालिकेच्या नाशिकरोड विभागातील अतिक्रमण निर्मूलनाच्या दोन पथकांनी सदर कारवाई केली. मौजे देवळालीतील स.नं. १२५/१ मधील कैलासजी सोसायटीतील २० बाय १२ फुटाचे अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. यावेळी नाशिकरोडचे विभागीय अधिकारी एस. डी. वाडेकर, अतिक्रमण विभागाचे सहायक अधीक्षक एम. डी. पगारे व नगररचना विभागाचे मिलिंद जोशी आदि उपस्थित होते.
नाशिकरोडला अनधिकृत बांधकामांवर हातोडा
By admin | Updated: April 24, 2016 23:53 IST