शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहात गाजला मोकाट श्वानांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:33 IST

गेल्या काही दिवसांपासून पंचवटी विभागातील सर्वच प्रभागात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढलेला आहे. श्वान पकडण्यासाठी किती वाहने, किती जाळ्या वापरतात, पकडलेले श्वान कुठे सोडतात याची विचारणा करून लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाला धारेवर धरले.

पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून पंचवटी विभागातील सर्वच प्रभागात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढलेला आहे. श्वान पकडण्यासाठी किती वाहने, किती जाळ्या वापरतात, पकडलेले श्वान कुठे सोडतात याची विचारणा करून लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाला धारेवर धरले. पंचवटी प्रभागाची बैठक सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत विनाचर्चा २० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली.बैठकीच्या प्रारंभीच नगरसेवक रुची कुंभारकर, कमलेश बोडके, सरिता सोनवणे यांनी मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याची तक्रार केली. श्वानांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, शिवाय श्वान रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांच्या मागे लागतात. काही दिवसांपूर्वी श्वानांनी बालकांना चावा घेतला होता. आता नागरिकांच्या घरात श्वान गेल्यावर दखल घेतली जाणार का असा संतप्त सवाल करून संबंधित विभागाची कोंडी केली.नगरसेवक जगदीश पाटील यांनी काही दिवसांपुर्वी पेस्ट कंट्रोलचे काम करणाºया उत्तम बागुल या कर्मचाºयाला श्वानाने चावा घेतल्याची माहिती दिली. तसेच प्रभागात काही दिवसांपूर्वी विद्युत विभागाने केबल टाकली मात्र त्यानंतर पथदीप बंद रहात असल्याच्या तक्र ारी वाढल्याचे पाटील यांनी सांगितले. प्रभागात नियमितपणे साफसफाईची कामे होत नाहीत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार पूनम सोनवणे, नंदिनी बोडके, पूनम धनगर, भिकूबाई बागुल, विमल पाटील यांनी केली. हिरावाडी तसेच प्रभाग क्र मांक ३ मध्ये जवळपास ८० टक्के पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याची तक्र ार पूनम मोगरे यांनी केली. पंतप्रधान योजनेचे अर्ज विक्री केली जात असल्याने लोकप्रतिनिधींची बदनामी होत असल्याची तक्रार शांता हिरे यांनी केली. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या तक्रारींची संबंधित विभागाने तत्काळ दखल घेऊन त्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना माने यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना दिल्या. यावेळी झालेल्या चर्चेत विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी, उद्यान विभागाचे वसंत ढुमसे, राहुल खांदवे, सी. बी. अहेर, संजय गोसावी, विद्युतचे वनमाळी, डॉक्टर कोकणी आदींनी सहभाग नोंदविला होता.