शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सहामाही परीक्षा दिवाळीनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:59 IST

नाशिक : दसºयानंतर व दिवाळीपूर्वी शालेय विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा घेण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा यंदा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने खंडित केली असून, महाराष्टÑ विद्या प्राधिकरणकडून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वेळेत शाळांना प्राप्त न झाल्याने थेट नोव्हेंबर महिन्यातच सहामाही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुटीचा आनंद घेण्याऐवजी परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.

नाशिक : दसºयानंतर व दिवाळीपूर्वी शालेय विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा घेण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा यंदा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने खंडित केली असून, महाराष्टÑ विद्या प्राधिकरणकडून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वेळेत शाळांना प्राप्त न झाल्याने थेट नोव्हेंबर महिन्यातच सहामाही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुटीचा आनंद घेण्याऐवजी परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.राज्य शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ’ उपक्रमांतर्गत गेल्या वर्षापासून महाराष्टÑ विद्या प्राधिकरणमार्फत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यास सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात पायाभूत चाचणी झाल्यानंतर दोन महिन्यात विद्यार्थ्यांची व शाळेची शैक्षणिक गुणवत्ता ठरवून अभ्यासात कच्चे असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी शिक्षकांनी करवून घ्यावी जेणे करून दसºयानंतर व दिवाळीपूर्वी होणाºया सहामाही अर्थात संकलित मूल्यमापन परीक्षेत विद्यार्थी निपुण व्हावेत हा हेतू आहे. त्यासाठी गेल्या वर्षी भाषा व गणित या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्या प्राधिकरणने सर्वच शासकीय व खासगी विद्यालयांना पुरविल्या होत्या. यंदा मात्र दोनऐवजी चार विषयांच्या म्हणजेच भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञान या विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्या प्राधिकरणमार्फतच पुरविण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. परंतु यंदा राज्य सरकारच्या व विद्या प्राधिकरणच्या उदासीनतेमुळे राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रकच कोलमडून पडले आहे. ज्या पायाभूत चाचणी परीक्षा जुलै महिन्यात होणे अपेक्षित होते, त्यांच्या प्रश्नपत्रिका न मिळाल्यामुळे त्या थेट दोन महिने लांबणीवर टाकण्यात आल्या. सप्टेंबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात सर्वच शाळांमध्ये पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात आली. शाळांच्या शिक्षकांनी सप्टेंबर महिन्यातच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून आपला निकाल शाळांना व केंद्र प्रमुखांना कळवून टाकला. मात्र परीक्षाच उशिरा झाल्याने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या मूळ हेतूलाच तडा गेला आहे. सुटीचा आनंद हिरावलासहामाही अर्थात संकलित मूल्यमापन परीक्षा आता ७ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहे. महापालिका, खासगी शाळांना येत्या १४ आॅक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्या लागणार असून, ४ नोव्हेंबर रोजी सुट्या संपतील. ५ रोजी रविवार असल्यामुळे सोमवार, दि. ६ रोजी शाळांना सुरुवात होईल व दुसºयाच दिवशी विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. दिवाळीच्या सुटीत विद्यार्थी व शिक्षकांना परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.