शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अर्धे शहर पाच तास अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:40 IST

नाशिक : टाकळी सबस्टेशनजवळील करंट ट्रान्सफार्मरला आग लागून तो फुटल्यामुळे सीबीएस, शालिमार, अशोकस्तंभ, द्वारका आणि टाकळी या मध्यवर्ती परिसरातील वीज सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ गायब झाल्याने येथील नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. सायंकाळी साडेसहाला खंडित झालेला वीज पुरवठा रात्री साडेअकरा वाजेपर्यंतही सुरळीत होऊ शकला नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.

ठळक मुद्देतांत्रिक बिघाड : करंट ट्रान्सफार्मरला आग; पावसामुळे वीजपुरवठा विस्कळीतशहर विभाग-१ आणि शहर विभाग-२ अशा दोन्ही विभागाला सीटीबस्टचा परिणाम सहन करावा लागला. रात्री साडेनऊ नंतर शहरातील बºयापैकी भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत

नाशिक : टाकळी सबस्टेशनजवळील करंट ट्रान्सफार्मरला आग लागून तो फुटल्यामुळे सीबीएस, शालिमार, अशोकस्तंभ, द्वारका आणि टाकळी या मध्यवर्ती परिसरातील वीज सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ गायब झाल्याने येथील नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. सायंकाळी साडेसहाला खंडित झालेला वीज पुरवठा रात्री साडेअकरा वाजेपर्यंतही सुरळीत होऊ शकला नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.उन्हामुळे नाशिककर हैराण झालेले असतानाच सायंकाळी विजेअभावी रस्त्यावरील पथदीप व घरातील दिवेही बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. शहर विभाग-१ अंतर्गत येणाऱ्या टाकळी सबस्टेशन येथे सायंकाळी करंट ट्रान्सफार्मर (सीटी)ला आग लागल्यामुळे अनेक फिडर्सवरील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे सीबीएस, शालिमार, एम.जी.रोड, गंगापूररोड आणि शरणपूररोडचा काही परिसर, गंजमाळ, द्वारका, काठेगल्ली , जुने नाशिक परिसरातील वीजपुरवठा सुमारे तीन तासांपेक्षा अधिक काळ खंडित होता.सिडको, सातपूरला वीज गायबसायंकाळच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्यामुळे सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटीसह परिसरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. टाकळी येथील केंद्रात तांत्रिक बिघाडामुळे निम्मे शहर अंधारात असताना सायंकाळी झालेल्या पावसामुळेदेखील अनेक भागांतील खंडित वीजपुरवठ्याने त्यात भर पडली.दोन्ही विभागातील फिडर्स प्रभावित सिटीला लागलेल्या आगीमुळे शहरातील बहुतांश भागातील फिडर्सला वीजपुरवठा होऊ न शकल्याने या फिडर्सवरील वीजग्राहकांचादेखील वीजपुरवठा खंडित झाला. शहर विभाग-१ आणि शहर विभाग-२ अशा दोन्ही विभागाला सीटीबस्टचा परिणाम सहन करावा लागला.सायंकाळच्या सुमारास ऐन बाजारपेठेतील वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला. तर रहिवासी क्षेत्रातही वीज गायब झाल्याने नागरिकांना वीज कंपनीच्या कार्यालयात धाव घ्यावी लागली. परंतु नेहमीप्रमाणेच ग्राहकांना कुठूनही पुरेशी माहिती मिळत नसल्याने वीज कधी येणार याची वाट ग्राहकांना रात्री १० वाजेपर्यंत पहावी लागली. रात्री साडेनऊ नंतर शहरातील बºयापैकी भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.