शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकसह देशभरातील एचएएल कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:09 IST

ओझर : प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यासाठी अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची व्यवस्थापनाबरोबर बंगळुरू येथे झालेली बोलणी फिसकटल्याने नाशिकसह देशभरातील नऊ विभागातील जवळपास २० हजार कर्मचारी सोमवारपासुन बेमुदत संपावर गेले आहेत.

ओझर : प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यासाठी अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची व्यवस्थापनाबरोबर बंगळुरू येथे झालेली बोलणी फिसकटल्याने नाशिकसह देशभरातील नऊ विभागातील जवळपास २० हजार कर्मचारी सोमवारपासुन बेमुदत संपावर गेले आहेत.गेली ३४ महिने अधिकारी वर्ग वाढीव पगार वाढीचा लाभ घेत असून फक्त कामगारांना त्यांच्या हककांपासून दूर ठेवण्याचे काम एचएएल उच्च व्यवस्थापन करत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. प्रलंबित वेतन कराराच्या बोलणी लवकरात लवकर पूर्ण करावी, अधिकारी वर्गाला दिल्याप्रमाणे कामगार वर्गाला हक्काची रास्त वेतन वाढ द्यावी या मागणीसाठी आॅल इंडिया एचएएल को-आॅर्डिनेशन कमिटीच्या माध्यमातून एचएएल कर्मचारी व्यवस्थापनाशी चर्चा करत आहेत.  व्यवस्थापनाने चांगला वेतन करार देण्याच्या आश्वासन , पाच वर्ष मुदतीच्या वेतन कराराची मागणी सोडून सर्व संघटना दहा वर्ष मुदतीच्या वेतन कराराच्या बोलणीसाठी तयार झाल्या आहेत. परंतु त्यानंतर ही व्यवस्थापनाने कामगारांची केवळ निराशा केली आहे. वाढीव पगारवाढीचे फरक पूर्ण मिळून वाढीव पगारवाढीचा लाभ अधिकारी वर्ग गेली ३४ महिने घेत असून कामगार वर्गाला जाचक अटी टाकून तुटपूंजी वाढ दिल्याने व्यवस्थापनाकडून कामगार वर्गाला दिल्या जाणाऱ्या अपमानकारक वागणुकीबद्दल तीव्र असंतोष, नाराजी पसरला असल्याचे पत्रकात म्हटले आहे.आस्थापनेप्रति कामगार प्रामाणिक असून, कंपनी जर आर्थिक संकटात असेल तर अधिकारीवर्गाला दिलेली वेतनवाढ रद्द करावी आणि आर्थिक स्थिती उत्तम झाल्यावर अधिकारी आणि कामगारांची वेतनवाढ करावी, अशी भूमिका कमिटीच्या वतीने मांडण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक