शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एचएएल कामगारांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात केन्दीय संरक्षण मंत्र्यांची भेट घेणार : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 23:46 IST

ओझरटाऊनशीप : देशाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या कामगारांना सरकारला न्याय देता येत नाही, ही बाब दुर्दैवी असुन देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र ेकाम करणाºया एच ए एल कामगारांनी कधीही इतकी टोकाची भुमिका या पुर्वी घेतली नव्हती सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे.

ठळक मुद्देव्यक्तीश: यात लक्ष घालणार असल्याची ग्वाही

ओझरटाऊनशीप : देशाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या कामगारांना सरकारला न्याय देता येत नाही, ही बाब दुर्दैवी असुन देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र ेकाम करणाºया एच ए एल कामगारांनी कधीही इतकी टोकाची भुमिका या पुर्वी घेतली नव्हती सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. निवडणुका झाल्यानंतर देशभरातील एच ए एल कामगार संघटनांच्या निवडक प्रतिनिधीसह आपण स्वत: केंद्रीय संरक्षणमंत्री यांची भेट घेऊन कामगारांचा वेतनकरारवाढीचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपकरी कामगारांना दिली.वेतन करारवाढी एच ए एल कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशी शरद पवार यांनी संपकरी कामगारांशी संवाद साधला.यावेळी पवार यांनी सांगितले की चीनच्या युद्धानंतर देशाची संरक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण यांनी एच ए एल कारखान्याची निर्मिती केली. देशाची संरक्षणाची गरज भागवून जगाला अन्य गोष्टी तयार करून पुरवण्याचे काम देखील तत्कालीन सरकारने केले होते.एच ए एल ने सुखोई विमानाचे काम यशस्वी केल्या नंतर भारतीय वायुसेनेच्या कामगिरीत सुखोईची भुमिका महत्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र सरकारने फ्रांन्स कडुन राफेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला राफेल चांगले पण सुखोई सरसच असल्याचे सांगत ज्यांना कागदी विमान बनवता येत नाही त्यांना सरकारने विमान बनवण्याचे काम दिले असा टोला त्यांनी लगावला. देशाची सेवा करणा-या कामगारांना सरकारला न्याय देता नाही केंद्र सरकारने अनुकूल निर्णय न घेतल्यानेच आज उद्योग क्षेत्राची अवस्था वाईट झाल्याचा आरोप करून आपन संरक्षणमंत्री असतांना एच ए एल ला किती वर्षे काम मिळेल, याचा अभ्यास करूनच विमान उत्पादनाची क्षमता असलेल्या एच ए एल ला काम दिल्याचे सांगितले.गेल्या काही वर्षात एच ए एल सह उद्योग क्षेत्रात कामगारांची संख्या सातत्याने कमी होतीय, परंतु अधिकाऱ्यांची संख्या वाढतीय हे अनुकूल नसल्याचे सांगत एच ए एल कामगारांची मागणी रास्त असुन यासाठी विधानसभा निवडणुकीनंतर आपण व्यक्तीश: यात लक्ष घालणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.या प्रसंगी कामगार नेते रामू जाधव, कामगार संघटनेचे अध्यक्ष भानुदास शेळके यांनी आपल्या भाषणातून संपकरी कामगारांच्या भावना व्यक्त केल्या.या वेळी माजी आमदार दिलीप बनकर, सरचिटणीस सचिन ढोमसे, माजी सरपंच राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :OzarओझरSharad Pawarशरद पवार