शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात गारपिटीने कांदा, डाळिंबाचे नुकसान

By admin | Updated: May 13, 2014 00:41 IST

येवला : वादळी वार्‍यासह गारपिटीने तालुक्याच्या पश्चिम भागातील नेऊरगाव, पुरणगाव, जळगावनेऊर, एरंडगाव, महालखेडा, एरंडगाव परिसराला झोडपल्याने कांद्यासह डाळींबबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

येवला : वादळी वार्‍यासह गारपिटीने तालुक्याच्या पश्चिम भागातील नेऊरगाव, पुरणगाव, जळगावनेऊर, एरंडगाव, महालखेडा, एरंडगाव परिसराला झोडपल्याने कांद्यासह डाळींबबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास वादळवार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. गारपिटीच्या तडाख्याने नेऊरगाव येथील सुरेश कदम यांचे ४०० क्िंवटल कांदे गारपिटीने झोडपले व पूर्णत: खराब झाले. रामनाथ कदम, विजय कदम, राजेंद्र बोराडे, वसंत कदम आदिंसह अनेक शेतकर्‍यांच्या डाळींबबागा पूर्णत: उखडल्या गेल्या. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मार्च महिन्यातील मोठ्या प्रमाणावर पावसाने पश्चिम भागात कांदा भिजला होता. तब्बल दीड महिन्यानंतर हा कांदा आतून पूर्णत: सडला आहे. हे नुकसान सोसत नाही तोच बुधवारच्या गारपिटीने उरले सुरले कांदे व डाळिंब बागा उखडल्या. मार्च महिन्यात पावसाने जमिनीतच भिजलेल्या कांद्याचे कायदेशीर गारपिटीच्या भाषेमुळे पंचनामे झाले नव्हते; परंतु केवळ पाण्याने भिजलेला हा कांदा जमिनीतच सडला होता. केवळ गारपिटीने भिजलेल्या कांद्याचे पंचनामे केले गेले. पण पावसाने सडलेल्या कांद्याचे काय? असा सवाल येथील शेतकर्‍यांनी विचारला आहे. आतातरी नुकसानीचे पंचनामे व्हावेत व आम्हाला न्याय द्यावा, अशी हाक येथील शेतकर्‍यांनी दिली आहे. तत्काळ सर्वे व्हावा व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. (वार्ताहर)इन्फो बॉक्सनेऊरगाव येथील दूध संकलन केंद्राच्या कार्यालयावर वादळवार्‍यामुळे एक झाड कोसळले व या कार्यालयाचेही नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्‍यांनी शेतात पोळ करून ठेवलेला कांदा गारपिटीच्या तडाख्यात सापडला. अचानकपणे गारपिटीने शेतकरी भांबावला व अनपेक्षित तडाखा बसल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.