शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हादरले नाशिक : राजीवनगरमध्ये मध्यरात्री दोघांवर टोळक्याकडून हल्लाशहरात पाच तासांत तीन खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:51 IST

नाशिक : बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुनांच्या घटनांनी शहर हादरले. साडेआठ ते साडेबाराच्या दरम्यान राजीवनगरमध्ये दोन, तर सिडकोच्या लक्ष्मीनगर परिसरात एक अशा तिघा व्यक्तींवर टोळक्याने धारधार शस्त्राने हल्ला चढविला.

ठळक मुद्देदोघा इसमांवर हल्ला करून खूनपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुनांच्या घटनांनी शहर हादरले. साडेआठ ते साडेबाराच्या दरम्यान राजीवनगरमध्ये दोन, तर सिडकोच्या लक्ष्मीनगर परिसरात एक अशा तिघा व्यक्तींवर टोळक्याने धारधार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. दोन्ही घटना या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अंबड व इंदिरानगर पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही घटनांमध्ये फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सिडकोतील खुनाच्या घटनेला अवघे काही तास उलटत नाही तोच पुन्हा राजीवनगर भागात टोळक्याने दोघा इसमांवर हल्ला करून खून केला.इंदिरानगर : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या दुचाकीची नुकसानभरपाई न मिळाल्याने सात-आठ जणांच्या टोळक्याने तिघांवर तलवार व कोयत्याने वार करून दोघांचा खून केल्याची घटना बुधवारी (दि़ २७) रात्री अकरा वाजेच्या सुमारास राजीवनगर झोपडपट्टीजवळील कलानगर-लेखानगर रोडवर घडली़ दिनेश नीळकंठ बिराजदार (२२, रा. गणेश चौक, सोनवणे चाळ, नाशिक) व देवीदास वसंत ईगे (रा. राजीवनगर झोपडपट्टी, इंदिरानगर, नाशिक) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी सहा संशयितांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे़ इंदिरानगर पोलीस ठाण्यात रमेश भीमराव गायकवाड (२२, रा़ पाथर्डी गाव, हनुमान चौक, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते दिनेश बिराजदार व देवीदास इगे यांच्यासमवेत दुचाकीने राजीवनगर झोपडपट्टी परिसरातून जात होते. यावेळी संशयित रवि गौतम निकाळजे, सचिन गौतम निकाळजे, दीपक दत्ता वाव्हळ, कृष्णा दादाराव शिंदे, नितीन उत्तम पंडित व बबलू डंबाळे (रा़ सर्व राजीवनगर झोपडपट्टी, इंदिरानगर) यांनी अडविले़ यानंतर रवि निकाळजे याने देवीदास इगेसोबत झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून दुचाकीवरील तिघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली, तर उर्वरित संशयितांनी तलवार व कोयत्याने दिनेश व देवीदास यांच्यावर वार केले. या हल्ल्यात दिनेश व देवीदास हे गंभीर जखमी झाले होते, तर रमेश गायकवाड हल्लेखोरांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरल्याने तो वाचला.रिक्षाचालक खून प्रकरणातील चौघांना अटकसिडकोत झालेल्या रिक्षाचालकाच्या खूनप्रकरणी अंबड पोलिसांनी गुरुवारपर्यंत चौघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर तिघे संशयित अद्याप फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दोन महिन्यांपूर्वी मयत रिक्षाचालक साहेबराव जाधव व संशयित गणेश राजेंद्र शिंगटे, प्रवीण राजेंद्र शिंगटे (रा़महाकाली चौक, सिडको), दर्शन उत्तम दोंदे, किरण महेंद्र निरभुवन, संतोष अरुण जाधव (रा़ अभियंतानगर, सिडको) यांच्यामध्ये वाद झाला होता़ साहेबरावने याबाबत पोलिसात तक्रार केल्याचा राग संशयितांच्या मनात होता़घटनेनंतर परिसरातील नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने हल्लेखोरांनी पळ काढल्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिनेशचा जागेवरच, तर देवीदासचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले़