नाशिक : भारतरत्न बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबर रोजी शहर परिसरात विविध संस्था, संघटना आणि शाळांमध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घरोघरी आणि चौकाचौकांमध्ये डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याने, चर्चासत्र आणि बुद्ध विहारांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाले. एस. के. पांडे विद्यालयचेहेडी येथील एस.के. पांडे महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्याध्यापक जिजा मोरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी आंबेडकर यांच्या जीवनचरित्राबाबत माहिती दिली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. कमलावती कोठारी शाळाजेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्याध्यापक राजश्री खोडके यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुषमा यादव यांनी आंबेडकरांच्या जीवनावरील प्रसंग सांगून मार्गदर्शन केले. सुनीता सोनगिरे यांनी ‘पहा पहा आंबेडकर’ हे गीत सादर केले. यावेळी सुरेखा पाटील, छाया जाधव, जयश्री भडके, मानसी झनकर, रेवती बुरकुले, शोभा गरूड उपस्थित होते. आभार रेखा पगार यांनी मानले. (प्रतिनिधी)
होता तो भीम माझा, कोहिनूर भारताचा...
By admin | Updated: December 7, 2015 22:19 IST