शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

१२०० विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर ‘हॅकर’चा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:14 IST

नाशिक : इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या सुमारे बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर अज्ञात ‘हॅकर’ने ...

नाशिक : इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या सुमारे बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर अज्ञात ‘हॅकर’ने डल्ला मारल्याचे शाळा तपासणीनंतर उघडकीस आले असून, शिक्षण विभागाने सदरची बाब गांभीर्याने घेऊन पुन्हा नव्याने या विद्यार्थ्यांची नव्याने शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याबरोबरच सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारितील केंद्रीय विद्यालयाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही ‘हॅकर’चा फटका बसला आहे.

केंद्र सरकारकडून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या म्हणजे शिख, ख्रिश्चन, पारशी, जैन, नवबौद्ध व मुस्लीम समाजाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी हजार रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती अदा केली जाते. त्यासाठी प्रत्येक शाळेला स्वतंत्र आयडी देऊन नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची माहिती भरली जाते. त्यात विद्यार्थ्यांचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता व त्याची जात व समाज तसेच त्याचे बँक खाते क्रमांक नमूद करण्यात येते. सन २०२०-२१ या वर्षात बहुतांशी शाळांनी अशा प्रकारची माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर भरलेली नसतानाही अज्ञात हॅकरने शासनाची साइट हॅक करून शाळांंच्या आयडीवर बोगस विद्यार्थ्यांची नावे भरली व त्यांच्या नावे जमा होणारी रक्कम हडप केल्याचा प्रकार चार महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. राज्यात हा प्रकार घडल्याने शालेय शिक्षण विभागाने त्याची चौकशी केली असता नाशिक जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांचे बनावट नावे टाकल्याचे उघडकीस आले होते. त्या आनुषंगाने सर्वच शाळांची तपासणी केली असता, जवळपास आठ ते दहा शाळांमध्ये सदरचा प्रकार उघडकीस येऊन १२३८ विद्यार्थ्यांची नावे बनावट नोंद केल्याचे उघडकीस आले. त्यात केंद्र सरकारच्या अखत्यारितील केंद्रीय विद्यालय एअरफोर्स व ओझर येथील शाळेचाही समावेश आहे. या शाळांचा अनुभव लक्षात घेऊन आता शिक्षण विभागाने आणखी सजग होत नव्याने विद्यार्थ्यांची नावे नोंद केली असून, त्यात जिल्ह्यातील २८,३६१ धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. त्यातील १९,२३३ विद्यार्थ्यांचे अर्जाची छाननी करण्यात आली आहे. हॅकरकरवी झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले आहे.