शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातही आता ‘ग्रीन जिम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:08 IST

जिल्हा परिषद : समाजकल्याण समितीच्या बैठकीत निर्णय

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : चालू आर्थिक वर्षात समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांमध्ये २० टक्के सेसअंतर्गत अखर्चित राहिलेल्या एक कोटी तीन लाखांच्या निधीतून मागासवर्गीय वस्त्यांमध्ये ग्रीन जिम तसेच ग्रामीण भागात मागासवर्गीय वस्त्यांमध्ये बेंच बसविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सभापती सुनीता रामदास चारोस्कर यांनी दिली.दलितवस्ती सुधारणा योजनांचे अपूर्ण कामे २००५ ते २०१७ पर्यंतच्या कामांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यात आतापर्यंत एकूण ५,४७२ दलितवस्ती सुधार योजनांची कामे मंजूर होऊन त्यातील ३२७१ कामे पूर्ण असून, सुमारे २२०१ कामे अपूर्ण असल्याचे आढाव्यातून स्पष्ट झाले. यातील बहुतांश कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेली आहेत. फक्त त्यांचा शेवटचा दहा टक्के निधीच्या शेवटच्या हप्त्याची मागणी न करण्यात आल्याने ही कामे अपूर्ण दिसत आहेत. संबंधित कामांच्या दहा टक्के निधीचे प्रस्ताव तातडीने तालुकास्तरावरून पाठवावेत, असे आदेश सभापती सुनीता चारोस्कर यांनी तालुका स्तरावरील सर्व समाजकल्याण विस्तार अधिकाऱ्यांना दिले. तीन टक्केअपंग सेस निधीअंतर्गत अपंग लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. सन २०१७-१८ वर्षासाठी एक कोटी ८० लाख अनुदान उपलब्ध असून, या अनुदानातून अपंग लाभार्थ्यांचे प्रस्ताव शासन निर्णयात नमूद १ ते ३४ योजनांनुसार अपंग लाभार्थ्यांनी मागणी केल्याप्रमाणे त्वरित प्रस्ताव प्राप्त करून देण्याच्या सूचना सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिल्या. या समाजकल्याण समितीच्या मासिक बैठकीस सदस्य हिरामण खोसकर, कन्हू गायकवाड, रमेश बरफ, यशवंत शिरसाट, सुरेश कमानकर, शोभाताई कडाळे, ज्योेती जाधव, वनिता शिंदे, सुमनबाई निकम आदी उपस्थित होते.अनेक कामांबाबत तक्रारी प्राप्त दलित वस्ती सुधार योजनांच्या अनेक कामांबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याने कामांचा दर्जा सुधारणा होण्याकामी यासंदर्भात गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाचे सर्व उपअभियंता यांची एक स्वतंत्र बैठक घेण्याचे आदेश सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले.