शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४० लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: March 7, 2017 01:27 IST

नाशिक : राज्यात गुटखाबंदी असतानाही शहरात अनेक ठिकाणी गुटखा वितरित होत असतानाच अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे ४० लाखांचा गुटखा जप्त केला आहे.

 नाशिक : राज्यात गुटखाबंदी असतानाही शहरात अनेक ठिकाणी गुटखा वितरित होत असतानाच अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे ४० लाखांचा गुटखा जप्त केला आहे. सदर कारवाई ही सर्वात मोठी मानली जात असून, यातून अवैध गुटखा विक्रीची माहिती समोर येण्यास मदत होणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त विजय वंजारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विभागाने नाशिकरोड येथील मालधक्का येथून गुटख्याने भरलेला ट्रक जप्त केला. अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार वंजारी यांना सकाळी माहिती मिळताच अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील, सहायक आयुक्त (अन्न) वाय. के. बेंडकोळे, अन्नसुरक्षा अधिकारी डी. के. सोनवणे आणि एस. डी. परेकर यांनी नाशिकरोड येथील मालधक्क्यावर सकाळी ६ वाजेपासूनच पाळत ठेवली होती. याठिकाणी एमएच ०४ पीजी ३६३८ क्रमांकाचा संशयास्पद ट्रक आला असता अधिकाऱ्यांनी ट्रकच्या चालकाकडे चौकशी केली असता त्याला नीट उत्तरे देता आली नाही. अधिकाऱ्यांनी ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये सुमारे १०० पोती गुटखा आणि सुगंधीत तंबाखू असल्याचे आढळून आले. चालकाकडे अधिक चौकशी केली असता सदर माल हा लोहिया यांच्या कंपनीसाठी आणला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सुमारे ४० लाख ४३ हजाराचा गुटखा जप्त करीत संबंधित ट्रेडर्सची चौकशी केली. तसेच जप्त केलेला माल सील करण्यात आला असून, त्याचे काही नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. गुटखाबंदी असतानाही शहरात गुटखा येत असल्याची खबर सहआयुक्त वंजारी यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आल्यानंतर लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची कारवाई सुरू होती. (प्रतिनिधी)