शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे रानडे यांची मैफल रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:24 IST

गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे स्वरसाधना मासिक बैठकीअंतर्गत शनिवारी सायंकाळी आशिष रानडे यांची मैफल रंगली.

ठळक मुद्देविविध राग सादर करून श्रोत्यांची मने जिंकलीमैफलीस परिसरातील रसिकश्रोते उपस्थित छोरा बरसाने की नार सादर करून दाद

नाशिकरोड : गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे स्वरसाधना मासिक बैठकीअंतर्गत शनिवारी सायंकाळी आशिष रानडे यांची मैफल रंगली. डॉ. अविराज तायडे यांचे शिष्य असलेल्या रानडे यांनी विविध राग सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.दत्तमंदिर चौकातील रामनगर बुद्ध विहारात झालेल्या या मैफलीस परिसरातील रसिकश्रोते उपस्थित होते. विजयालक्ष्मी मनेरीकर यांनी स्वागत केले. पं. शंकरराव वैरागकर यांनी प्रास्ताविक केले. गायक आनंद अत्रे, सुमित्रा पाटोळे, श्रीकांत कुलकर्णी, नंदू खाडे, नंदूशेठ भुतडा, सागर कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. तबल्यावर नितीन पवार, संवादिनीवर दिव्या रानडे यांनी साथसंगत केली. त्यांनी बडा ख्याल सादर केला. एकतालात गोकूल गाव के छोरा बरसाने की नार सादर करून दाद मिळवली. राग कलावतीत ताल रूपकात पिया ना मानत हमरी बात हा राग सादर केला. नंतर इंद्रायणी काठी लागली समाधी या अभंगाला टाळ्या मिळाल्या. भवानी दयानी ही भैरवी गाऊन त्यांनी मैफलीचा समारोप केला. या मैफिलीचे आयोजन सरिता वैरागकर व ओंकार वैरागकर यांनी केले होते. हितेश्वर पाटील यांनी ध्वनीव्यवस्था सांभाळली. मदन लिंबारे, सार्थक खैरनार, श्रृती बोरसे, प्रणाली शंकपाल, हर्षल गोळेसर, समृद्धी गांगुर्डे आदींनी संयोजन केले.