शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांमध्ये गुरूपूजन सोहळा

By admin | Updated: July 10, 2017 00:45 IST

नाशिक : ‘जय जय, जय गुरूदेवा’ आणि जयदेव गुरूदत्त असा जयघोष करीत गुरूपूजनासह धार्मिक कार्यक्रम संपन्न झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘जय जय, जय गुरूदेवा’ आणि जयदेव गुरूदत्त असा जयघोष करीत शहरातील विविध मंदिरांमध्ये गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूपूजनासह धार्मिक कार्यक्रम संपन्न झाली. गोदाघाटानजीक असलेल्या एकमुखी दत्तमंदिरात गुरूपौर्णिमेनिमित्त सकाळी रुद्राभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त मंदिराची फुलांनी सजावट केली होती. यावेळी अभिषेक, महाप्रसाद आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. गंगापूररोडवरील लोकतीर्थ आश्रमात ढेकणे महाराजांच्या शिष्यांच्या वतीने सकाळी धान्यधारणा करण्यात आली. त्यानंतर जप, आरती, प्रसाद आणि कार्यक्रम झाले. आषाढ पौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या स्वामी समर्थ मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच जय जय स्वामी समर्थचा मंत्र जपत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.  जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज धर्मपीठाचे स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने आडगाव, ओझर मार्गावरील आश्रमात गुरूपौणिमेनिमित्त बालसंस्कार शिबिर जपानुष्ठान, हस्तलिखित नामजप, भावगत, वाचन, प्रवचन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बालेश्वर येथील महादेव मंदिरात पहाटे जनार्दन स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पाद्यपूजन व सदगुरू दर्शन सोहळा झाला. विश्वजागृती मिशनविश्वजागृती मिशनचे संस्थापक सुधांशू महाराज यांचा गुरूपौर्णिमा महोत्सव समर्थ मंगल कार्यालय वसंत मार्केट कॉनडा कॉर्नर येथे आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त सुधांशू महाराज यांच्या चरणपादुका, पूजन, ओंकारजप, प्रभूस्मृती, सामुदायिक प्रार्थना, समधुर भजन संध्या आरती, महाप्रसाद आदिसह धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी ओंकारसिंह राजपूत, नागरे, भालचंद्र राणे, विठ्ठल शिंपी, रमेश कासार आदि उपस्थित होते.