शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात हजर राहण्याचे भिडे गुरुजींना समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:55 IST

नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी हे न्यायालयात गैरहजर राहत असल्याने त्यांना समन्स काढण्याचे आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकजा धांडे यांनी शुक्रवारी (दि़३१) दिले़ येत्या २८ सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश या समन्समार्फत भिडे यांना बजावले जाणार आहेत़

नाशिक : नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी हे न्यायालयात गैरहजर राहत असल्याने त्यांना समन्स काढण्याचे आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकजा धांडे यांनी शुक्रवारी (दि़३१) दिले़ येत्या २८ सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश या समन्समार्फत भिडे यांना बजावले जाणार आहेत़ भिडे गुरुजी यांच्याविरोधात  नाशिक महापालिकेने खटला दाखल केला असून, त्यावर आज  झालेल्या सुनावणीत हे आदेश देण्यात आले़प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू असून, ७ आॅगस्ट रोजी प्रथम सुनावणीसाठी ठेवले होते़ यानंतर १० आॅगस्ट, २४ आॅगस्ट या दोन्ही तारखांना भिडे न्यायालयात हजर राहिले नाहीत़ भिडे यांनी न्यायालयात हजर रहावे यासाठी ३१ आॅगस्ट ही तारीख ठेवण्यात आली होती़  न्यायाधीश पांडे हे रजेवर असल्याने पंकजा धांडे यांच्या न्यायालयात सुनावणी होती़ मात्र, भिडे आजही न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात समन्स काढण्याचे आदेश धांडे यांनी दिले़ सरकारी वकील जाधव यांनी भिडे यांना समन्स काढण्याची मागणी न्यायालयाकडे केली, तर संभाजी भिडे यांचे वकीलपत्र अ‍ॅड़ अविनाश भिडे यांनी घेतले आहे़आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने त्यासंदर्भात भिडे गुरुजी यांना नोटीस बजावून चौकशीला हजर राहण्याचे सांगण्यात आले. परंतु भिडे गुरुजींकडून नोटीस स्वीकारण्यात आली नाही, वा चौकशीलाही ते उपस्थित न राहिल्याने महापालिकेने यासंदर्भातील अहवालासह नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला़नाशिकममधील १० जून रोजी झालेल्या सभेत आंबे खाल्याने मुलं होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले होते़ या वक्तव्याबाबत ‘लेक लाडकी अभियानह्णतर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकाकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत, नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागास सदरील वक्तव्याची खातरजमा करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त संचालकांनी दिले होते.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीMangoआंबा